कुडाळवासीयांना आधार! आता अर्ध्या तासात स्वॅब रिपोर्ट, वाचा सविस्तर...

अजय सावंत
Saturday, 8 August 2020

आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहात कोविड-19 रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट सेंटर सुरू केले आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) - आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे दोन दिवसांपूर्वीच मंजूर झालेल्या कोविड रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट सेंटरचे उद्‌घाटन आज सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह येथे आमदार नाईक यांच्या हस्ते झाले. या सेंटरमध्ये अर्ध्या तासात स्वॅब रिपोर्ट मिळणार आहेत. 

वाचा - 'ही' शिवेसनेची जुनी खोड ; निलेश राणेंची टीका 

कोरोनाची लक्षणे आढळणाऱ्या तालुक्‍यातील नागरिकांची कोविड टेस्ट जलद करून मिळावी, त्यांना दूरवर टेस्टसाठी जावे लागू नये, यासाठी आमदार नाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सक चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी खलिफे यांच्याशी संपर्क साधून रॅपिड टेस्ट किट व टेक्‍निशियन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आजपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विश्रामगृहात कोविड-19 रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट सेंटर सुरू केले आहे.

शुभारंभप्रसंगी ओरोस जिल्हा रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत नलावडे, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, तेंडोली जिल्हा परिषद सदस्य वर्षा कुडाळकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपसभापती श्रेया परब, संजय भोगटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाठ, जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, सागर नांदोसकर, राजू गवंडे, बबन बोभाटे, गुरुनाथ सडवेलकर, जीवन बांदेकर, सचिन काळप, प्रज्ञा राणे, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्‍वर, रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर, बाळा वेंगुर्लेकर, कृष्णा तेली, नितीन सावंत, बाबी गुरव, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वालावलकर, डॉ. गौरव घुर्ये, परिचारिका सौ. नाडकर्णी, डॉ. सचिन मेहेंत्रे, डॉ. अमोल दुधगावकर, विनम्र तारी, विनोद जाधव, श्री. देसाई, सिद्धार्थ बांवकर, समीर इलियास आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - नारायण राणे पोहचले विजयदुर्गवर अन्.... 

नलावडे म्हणाले.... 
याबाबत डॉ. नलावडे म्हणाले, या ठिकाणी कोविड-19 रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून जी टेस्ट होईल. त्याचा रिपोर्ट अर्ध्या तासात मिळेल. तपासणीमध्ये जो रुग्ण पॉझिटिव्ह असेल किंवा लक्षणे दिसतील त्यांना तत्काळ ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाईल. जे निगेटिव्ह आढळतील त्यांनी हॉस्पिटलमध्ये राहायचे, की अन्य याबाबतचा निर्णय ते घेऊ शकतात. आपला स्टाफ या ठिकाणी कार्यरत असेल. 

रुग्णांसाठी फायदेशीर 
तालुक्‍यातील कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता तसेच येथील नागरिकांना कोविड टेस्टसाठी दूरवर जावे लागू नये, यासाठी तालुक्‍यात रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट सेंटर करण्याच्या दृष्टीने आमदार नाईक यांनी प्रयत्न केले. सध्या कोरोनाचा फैलाव पाहता कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तसेच मुंबई व इतर भागातून आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे आढळत असल्यास त्यांची रॅपिड कोविड टेस्ट या ऍन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जाणार आहे. तीस मिनिटांमध्ये त्याचा रिपोर्ट मिळणार आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid rapid antigen test center in kudal konkan sindhudurg