esakal | ऐकावं ते नवलच; मास्क लावायला सांगितले म्हणून केली मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

ऐकावं ते नवलच; मास्क लावायला सांगितले म्हणून केली मारहाण

ऐकावं ते नवलच; मास्क लावायला सांगितले म्हणून केली मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : मास्क लाव, असे सांगितल्याचा राग येऊन एकाने दुसऱ्यास काठीने मारहाण केल्याची घटना मंगळवारी (४) तालुक्‍यातील पोफळी नाका रिक्षा स्टॉप येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी (chiplun police) मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा (crime) दाखल केला आहे.

कोंडीराम धोंडीराम येडगे (पोफळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद मधुकर बाबाजी इंदूलकर (६१, कोंडफणसवणे) यांनी दिली आहे. ते या मारहाणीत जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील इंदूलकर हे कामानिमित्त पतसंस्थेत जात असताना त्या वेळी तालुक्‍यातील पोफळी (pofali)नाका रिक्षा स्टॉप (auto stop) या ठिकाणी येडगे हा उभा होता. तो इंदूलकर यांच्याजवळ येऊन काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांनी त्यास मास्क (mask) लाव व नंतर माझ्याशी बोल, असे सांगितले. याचा येडगे याला राग आल्याने त्याने इंदूलकर यांना शिवीगाळ केली. यानंतर इंदूलकर हे पतसंस्थेत जाऊन पुन्हा परत घरी जात असताना येडगे याने त्यांना शिवीगाळ करून पाठीमागून येऊन हातातील लाकडी काठीने त्याच्या डोक्‍यात उजव्या बाजूस मारून दुखापत केली. या घटनेनंतर इंदूलकर यांनी येडगे विरोधात तक्रार दिल्यानुसार त्याच्यावर अलोरे शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: धक्कादायक! चक्क फ्रीजखाली बसला होता नाग, पाहिला अन् बोबडीच वळली