esakal | आम्हाला न भेटता वॉर्डमध्ये का गेले ? कामथे रुग्णालयातील डॉक्टरला महिलेकडून धक्काबुकी

बोलून बातमी शोधा

आम्हाला न भेटता वॉर्डमध्ये का गेले ? कामथे रुग्णालयातील डॉक्टरला महिलेकडून धक्काबुकी
आम्हाला न भेटता वॉर्डमध्ये का गेले ? कामथे रुग्णालयातील डॉक्टरला महिलेकडून धक्काबुकी
sakal_logo
By
मुझ्झफर खान

चिपळूण : कामथेतील उपजिल्हा रुग्णालयातील एका डॉक्टरला सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकार्‍यांकडून धक्काबुक्की करण्यात आली. डीएनए टेस्टचे सँपल घेण्यास उशीर झाल्याच्या कारणावरुन हा प्रकार शनिवारी संध्याकाळी 4 वाजता घडला. कामथे उपजिल्हा रूग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.

या संदर्भात कामथे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारा डॉ. अजय सानप यांनी सांगितले की, एका गतीमंद मुलीला झालेल्या बाळाची डीएनए टेस्ट करण्यासाठी कामथे रुग्णालयात पोलिस व एका सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आले होते. त्या ठिकाणी या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी जाण्यास फोटो काढण्याच्या विषयावरून उशीर केला. त्यानंतर डॉक्टर सानप जेवणासाठी दुपारी निघून गेले. त्यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टरला जेवून आल्यानंतर हे सँपल घेण्यास सांगितले. सदरचे डॉक्टर जेवून आल्यानंतर थेट रूग्णालयाच्या वॉर्डमध्ये गेले हेच वादावादीचे कारण ठरले. आम्ही खूप वेळ वाट पहात असताना सुद्धा डॉक्टर आम्हाला न भेटता वार्डमध्ये का गेले ? असे संस्था पदाधिकार्‍यांचे म्हणणे होते.

हेही वाचा: गुहागरला लसीकरण केंद्रात पहिल्याच दिवशी गोंधळ

त्यावर संबंधित डॉक्टर डीएनए सँपलसाठी आलेल्या पोलिसांना म्हणाले, तुम्ही वरच्या कार्यालयात येऊन बाकी कागदपत्र पूर्ण करू शकला असता. त्यावेळी संबंधित संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी मध्येच बोलण्यास सुरुवात केली. तिथे वादाला सुरुवात झाली व ते डॉक्टर आपल्या कार्यालयात निघून गेल्याने सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकार्‍याने पाठीमागून जावून डॉक्टरला धक्काबुक्की केली असे डॉक्टरांचे म्हणने आहे. यासंदर्भात डॉक्टर सानप यांनी पोलिस स्टेशनला कळवले. नंतर हे प्रकरण मिटवण्यासाठी विविध स्तरातील लोकांचे तातडीने फोन गेल्याने डॉक्टरांमध्ये अस्वस्थता पसरली होती. हे प्रकरण उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यापर्यंत गेले. डॉक्टरांना मारहाण करणार्‍यांनी आपली चुक कबुल करून माफीनामा लिहून दिला. त्यामुळे सांयकाळी उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे.

"कोरोना काळात डॉक्टर काम करत असताना त्यांच्यावर प्रचंड ताण तणाव आहे. अशावेळी आपण जर सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेत असू तर निश्चितच संयमाने व सबुरीने घेणे ही जबाबदारी असते ते कोणत्याही परिस्थितीत शारीरिक हल्ला करण्याचा अधिकार कोणालाही नाहे."

- डॉ. अजय सानप, वैद्यकीय अधिकारी कामथे उपजिल्हा रूग्णालय

हेही वाचा: परीक्षेला सुट्टी, शाळेला बुट्टी; मुलांची मानसिकता बिघडतेय