esakal | 5 लाख रुपये आण, नाहीतर तू घरात राहायचे नाही; विवाहितेला मारहाण I Crime
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

काही महिने सुखाचा संसार केल्यानंतर सदर महिलेला पती, सासू आणि नणंद या तिघांनी त्रास देण्यास सुरवात केली.

'5 लाख रुपये आण, नाहीतर तू घरात राहायचे नाही'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लांजा : लांजा शहरातील अगरवाडी येथे विवाहितेला उपाशी ठेवून मारहाण करीत पाच लाखाची मागणी केल्याचा आरोप असलेल्या विवाहितेचा पती, सासू व नणंदेविरोधात लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ६ जानेवारी २०२१ रोजी आगरवाडी येथे राहणारे गौरव सावंत यांच्याबरोबर माया सावंत या युवतीने लग्न केले होते. काही महिने सुखाचा संसार केल्यानंतर सदर महिलेला पती, सासू आणि नणंद या तिघांनी त्रास देण्यास सुरवात केली. सुरवातीला भांडण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सातत्याने सुरू होते; मात्र त्यानंतर सदर महिलेला मारहाण करून मानसिक त्रास देण्यास सुरवात केली. एवढ्यावरच न थांबता शेवटी तिला उपाशी ठेवून तिचा जाच करण्यास सुरवात केली आणि तू आपल्या माहेरहून पाच लाख रुपये आण नाहीतर मोठा हुंडा घेऊन माझ्या मुलाचे दुसऱ्या मुलीशी लग्न करून देईन, असे धमकावण्यात आले.

हेही वाचा: पालकमंत्र्यांच्या दरबारी झाली 'BJP' नेत्याची एंट्री अन्...

माझे बाबा पैसे कुठून देणार, अशी सदर विवाहिता वारंवार विनंती करूनदेखील घरातील माणसे ऐकण्यास तयार नव्हती. पाच लाख रुपये आण नाहीतर तू घरात राहायचे नाही, असे सांगून सदर महिलेला लग्नाच्यावेळी अंगावर घातलेले स्त्रीधन काढून घेऊन तिला माहेरी पाठवून देण्यात आले. अशा प्रकारची फिर्याद सदर महिलेने लांजा पोलिस ठाण्यामध्ये दिली आहे. या प्रकरणी लांजा पोलिसांनी पती गौरव सावंत, सासू माया सावंत व नणंद तेजश्री सावंत या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अद्याप संशयिताना अटक केलेली नाही. अधिक तपास लांजा पोलिस करीत आहेत.

loading image
go to top