esakal | पालकमंत्र्यांच्या दरबारी झाली 'BJP' नेत्याची एंट्री अन्... I Politics
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्र्यांच्या दरबारी झाली 'BJP' नेत्याची एंट्री अन्...

बैठकी दरम्यान सामंतांविरोधात वारंवार सोशल मीडियावर विरोधी पोस्ट करणारे भाजप नेते राजू कीर तेथे दाखल झाले.

पालकमंत्र्यांच्या दरबारी झाली 'BJP' नेत्याची एंट्री अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसेनेचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत पालिकेच्या प्रभागनिहाय बैठका घेत, असताना भाजप नेते राजू कीर यांची कार्यक्रमस्थळी एन्ट्री झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्ष म्हणून कीर यांची सामंतांविरुद्ध टीका-टीपणी असते. मात्र, पक्ष बाजूला ठेऊन कीर यांनी विकासकामांसाठी म्हणजे मांडवी येथील क्रुझ टर्मिनसच्यादृष्टीने सामंत यांची भेट घेतली. सामंत यांनीही पक्षभेद न करता विकासासाठी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या दोघांची भेट सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा: केंद्राच्या मदतीनं परमबीर सिंह यांना शोधत आहोत: वळसे पाटील

मंत्री उदय सामंत पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागनिहाय बैठका घेत आहेत. नुकतीच त्यांची प्रभाग क्र. १४ मध्ये बैठक झाली. सामंत शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. बैठकी दरम्यान सामंतांविरोधात वारंवार सोशल मीडियावर विरोधी पोस्ट करणारे भाजप नेते राजू कीर तेथे दाखल झाले. कार्यक्रमस्थळी त्यांची एन्ट्री झाली आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, राजू कीर विकास कामाच्यादृष्टीने सामंत यांना भेटण्यासाठी आले होते. उदय सामंत यांनी देखील विरोधक आणि स्वकीय, असा भेदभाव न केला नाही. किर ह्यांच्याशी एका मित्राप्रमाणे सामंत यांनी संवाद साधला. बैठकीला विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख व नगराध्यक्ष बंड्या साळवी, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, उपशहरप्रमुख प्रशांत साळुंखे, ऍड. सचिन नाचणकर, भैरी देवस्थान चे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, सुरेंद्र भाटकर आदी उपस्थित होते.

५ ऑक्टोबर होणार बैठक

मांडवी येथे क्रुझ टर्मिनस व्हावे, यासाठी राजू कीर यांचा प्रयत्न आहे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने त्यांचा हा चांगला प्रयत्न आहे. त्याला सामंत यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन विकासकामासंदर्भात मनमोकळेपणाने चर्चा केली. कीर यांच्या मागणीनुसार सामंत यांनी तातडीने ५ ऑक्टोबर संबधित विभागाची बैठक आयोजित केली.

हेही वाचा: CSK vs SRH Live: ब्राव्होची कमाल; कर्णधार विल्यमसन माघारी

loading image
go to top