अल्पवयीनवर अतिप्रसंग करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी

crime case one person punishment of 20 years servitude in ratnagiri
crime case one person punishment of 20 years servitude in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी न्यायालयाने विकास विठ्ठल पवार (वय ३५, रा. मेर्वी, मांडवकरवाडी, रत्नागिरी) या तरुणाला २० वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्षे साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

आई-वडील असतानाही पोरकेपणाचे जगणे जगणाऱ्या तीन लहान मुलांनी आश्रय घेतला. त्यांच्या असाह्यतेचा फायदा उठवत अल्पवयीन मुलीवर विकास विठ्ठल पवार याने अतिप्रसंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. गुन्हा शाबित झाल्यामुळे न्यायालयाने विकास पवारला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील मेघना नलावडे यांनी काम पाहिले.
ही घटना १६ जून २०१९ ला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

शहरातील एका ठिकाणी आपल्या दोन भावंडांसह झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला होता. तेथे रात्री चालण्यास गेलेल्या एकाला पायऱ्यांवर एक अल्पवयीन मुलगी दोन भावंडांसह पायऱ्यावर झोपलेली दिसून आली. आणखी एक पुरुष तिथे संशयास्पदरित्या वावरत होता. व्यक्तीने आपल्या आणखी एका सहकाऱ्यासह त्याच्यावर नजर ठेवली तेव्हा तो मुलीवर अतिप्रसंग करताना आढळून आला. या दोघांना पाहताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

चाईल्डलाईनचे कार्यकर्तेही तेथे दाखल झाले होते. पोलिसांनी संशयित विकास पवार याच्याविरोधात बलात्काराचा ३७६ आणि बालकांचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम क्रमांक ४, ५ (एम), ८ प्रमाणे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. पीडित मुलीला त्रास वाटू लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; तसेच तिचा छोटा भाऊ व बहीण यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते.

या लहान मुलांनी त्यांचे वडील सकाळी रिक्षातून त्यांना या ठिकाणी आणून सोडतात व रात्री घेऊन जातात, अशी माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणी अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने विकास पवार याला शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे यांनी केला होता.पीडित मुलीचे जाबजबाब महिला पोलिस उपनिरीक्षक जाधव यांनी नोंदवले होते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com