esakal | धक्कादायक! कणकवलीतील रिक्षाचालकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या

बोलून बातमी शोधा

धक्कादायक! कणकवलीतील रिक्षाचालकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
धक्कादायक! कणकवलीतील रिक्षाचालकाची धावत्या रेल्वेखाली आत्महत्या
sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : शहरातील वासुदेव दत्ताराम लाड (वय 50 रा. कांबळीगल्‍ली) यांनी हळवल रेल्वे फटका नजीक धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वासुदेव लाड हे रिक्षा व्यावसायिक होते. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यामुळे ते घरीच असत. आजारपणाला कंटाळून नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी वासुदेव यांनी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रेल्वे ट्रॅकमन गस्त घालत असताना त्यांना हळवल रेल्वे फटका नजीक हा मृतदेह आढळला.

हेही वाचा: 'जामिनावर सुटला आहात; महागात पडेल' संतापलेल्या चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

रेल्वेची धडक बसून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रॅकमन ने कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर यांना सदर घटनेची माहिती देताच रेल्वे पोलिस राजेश कांदळकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. कणकवली पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. याबाबत कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे