esakal | 'जामिनावर सुटला आहात; महागात पडेल' संतापलेल्या चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा

बोलून बातमी शोधा

Chandrakant Dada Patil Chagan Bhujbal
'जामिनावर सुटला आहात; महागात पडेल' संतापलेल्या चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशारा
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जनतेने नापसंत केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पूरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे आक्रमक झाले. ते म्हणाले छगन भुजबळांनी पंढरपूरवर आपली प्रतिक्रिया द्यावी. बंगाल वगैरे साेडा. बाेलयाचे तर आसामवर बाेला. तुम्ही जामीनावर सुटला आहात. तुम्ही निर्दाेष सुटलेला नाही. त्यामुळे फार जाेरात बाेलू नका अन्यथा फार महागात पडेल.

भूजबळांनी बाेलायचे तर पंढरपूरवर, आसाम, तामिळनाडूवर बाेलावे. पश्चिम बंगालमधला आमचा पराभव झाला आहे हे मान्य आहे असेही पाटील यांनी नमूद केले. काेविड काळात निवडणुका झाल्या. काेविडचे कारण भाजपसाठी तापदायक ठरले का यावर पाटील म्हणाले हा निर्णय निवडणुक विभागाचा आहे. या देशात विराेधकांना त्यांच्या बाजूने निकाल झाले तर बर वाटातात. त्यांच्या विराेधात झाले तर चुकीचे वाटता. आता पश्चिम बंगालमध्ये ईव्हीम बराेबर आहे असे म्हणतील.

तीन आमदार ते 81 आमदार अपेक्षीत विजय मिळाला नाही याचे दुख वाटतंय का. यावर पाटील म्हणाले दुख तर आहेच. सर्व निवडणुकीत आम्ही जाताे. पंढरपूर निवडणुकीत आम्ही सर्वजण उतरलाे हाेते. अन्य पक्षात स्टेटस असते. मी या निवडणुकीत कसे जाणार असे म्हणतात. आम्ही कार्यकर्ते असताे. नेते नाही. अमितभाई, माेदीजी यांच्यासह खूप कार्यकर्ते, नेते पश्चिम बंगालमध्ये गेले. आम्ही थिंक इन डिटेल आणि थिंक अॅन्ड अॅडव्हान्स अशी भुमिकेतून करीत असते. काॅंग्रेस आणि डाव्यांनी त्यांची मते ममतांच्या पारड्यात टाकली. सगळे एकत्र आले भाजपच्या पराभवासाठी अशी टिप्पणी पाटील यांनी केली.

सेनेचे मंत्री म्हणतात, 'लाश वही है सिर्फ कफन बदला गया'

Video पाहा : आम्हीच जिंकू; चंद्रकांतदादांनी सरकार कसं पडेल तेही सांगून टाकलं