esakal | विवाहितेच्या छळ प्रकरणी नवऱ्यासह चौघांवर गुन्हा; रत्नागिरीतील घटना

बोलून बातमी शोधा

विवाहितेच्या छळ प्रकरणी नवऱ्यासह चौघांवर गुन्हा; रत्नागिरीतील घटना
विवाहितेच्या छळ प्रकरणी नवऱ्यासह चौघांवर गुन्हा; रत्नागिरीतील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : रत्नागिरी येथे सासरी असलेल्या विवाहितेचा पैशासाठी मानसिक छळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत येथील पोलिस ठाण्यात नवरा, सासू-सासऱ्यासह भावजयीवर आज गुन्हा दाखल झाला. याबाबतची माहिती सहायक पोलिस निरीक्षक स्वाती यादव यांनी दिली. पिडिता सावंतवाडी तालुक्यातील आहे. तिचे रत्नागिरी येथे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे; मात्र पतीचे काका आणि काकू यांच्यासह पती व तिच्या चुलत भावाची बायको या दोघांकडून वेळोवेळी हुंड्याची मागणी होत होती. याबाबत माहेरच्या लोकांकडून समज देण्यात आली; मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पैशाची मागणी सुरू होती.

पैसे न दिल्याच्या कारणावरून पीडितेला मारहाण होत होती. जाचाला कंटाळून संबंधित विवाहितेने येथील तालुक्‍यातील माहेरी धाव घेत घडलेली हकीकत सांगितली. सहाय्यक पोलिस निरीक्षक महिला पोलीस अधिकारी यादव यांनी विवाहितेचा जबाब नोंदविला. दिलेल्या फिर्यादिनुसार, ४९८ कलमान्वये संशयितांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस अंमलदार प्राजक्ता कदम अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीचा 'तो' मेसेज फेकच!