जातीवाचक शिवीगाळ केल्याने पाच जणांवर गुन्हा दाखल 

मुझफ्फर खान
Wednesday, 14 October 2020

पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

चिपळूण - तुरंबव येथील शारदादेवीच्या मंदिरात झालेल्या जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी अखेर पाच जणांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

तुरंबव येथील शारदादेवी देवी मंदिरातील सभा मंडपात 6 ऑक्टोबरला नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने गाव कमिटी व ट्रस्ट कमिटी यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत देवीच्या ओट्या भरण्यावरून मोठा वाद झाला होता. 

उत्सवाच्या काळात देवीची रूपे लावायची मात्र ओट्या फक्त पंडित लोकच भरतील असे सुभाष पंडित यांनी सागितले. त्याला गाव कमिटीचे सदस्य श्रीधर पालशेतकर यांनी विरोध केला.

हे पण वाचारत्नागिरीत रूग्णसंखेत पुन्हा वाढ ; आज 79 नवे कोरोना बाधित

 भरायच्या असतील तर सर्व ग्रामस्थांना भरायला द्या असे सांगताच संशयित आरोपी दिगंबर श्रीराम पंडित, नारायण संभाजी पंडित, सुभाष श्रीराम पंडित, दत्ताराम श्रीराम पंडित, कृष्णा भिकाजी पंडित यांनी श्रीधर पालशेतकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर श्रीधर पालशेतकर यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime register against five persons in ratnagiri