शेतकऱ्यांच्या जीवाला 'त्या' प्राण्यांपासून धोका... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crocodie death in banda kokan marathi news

मडुरा-उपराळ येथे दोन गवे मृत झाल्याच्या घटनेस २४ तास न उलटताच आज मडुरा-मोरकेवाडी येथे नदीत महाकाय मगर मृतावस्थेत आढळली.

शेतकऱ्यांच्या जीवाला 'त्या' प्राण्यांपासून धोका...

बांदा (सिंधुदूर्ग) : मडुरा-उपराळ येथे दोन गवे मृत झाल्याच्या घटनेस २४ तास न उलटताच आज मडुरा-मोरकेवाडी येथे नदीत महाकाय मगर मृतावस्थेत आढळली. या परिसरात दुर्गंधी येत असल्याने शेतकऱ्यांनी पाहिले असता सहा फुटी मगर मृतावस्थेत पाण्यात तरंगताना दिसून आली. सदर मगर दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी अनिल साळगावकर यांनी मृत मगरीचे विच्छेदन केले. वनविभाग व ग्रामस्थांनी त्या मगरीवर अंतिम संस्कार केले.मडुरा परिसरात मगरींची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांचा उपद्रव वाढत आहे. नदीच्या बाजूलाच शेतकऱ्यांनी मिरची, चवळी, मका, भुईमूग आदी पिकांची शेती केली आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांचा वावर कायम असतो. अशा धोकादायक मगरींबाबात वनविभागास कल्पना देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आमच्या जीवास धोका निर्माण होत असल्याचे  शेतकऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा- ब्रेकिंग : नाणार समर्थकांची सेनेतून हकालपट्टी...

परिसरात मगरींचाी संख्या जादा
 शेतकरी मधुसुदन परब हे आपल्या शेतात फेरफटका होते यावेळी त्यांना दुर्गंधी येत असल्याने पुढे जाऊन पाहिले असता, महाकाय मगर मृतावस्थेत तरंगताना दिसली. याची खबर त्यांनी ग्रामस्थांना दिल्यानंतर वनविभाग व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. नदीतील पाण्याचा प्रवाह तेरेखोल नदीला मिळत असल्याने परिसरात मगरींचा उपद्रव मोठा असल्याचे शेतकरी नारायण परब यांनी सांगितले.

हेही वाचा- नाणारसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची  राजीनामा देण्याची तयारी....

मगरींचा तात्काळ बंदोबस्त करावा

मगरींनी शेतकऱ्यांसह त्यांच्या पाळीव प्राण्यांवर अनेक हल्ले करून मोठ्याप्रमाणात नुकसान केले असताना झोपी गेलेल्या प्रशासनाने अशा मगरींचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे नारायण परब यांनी सांगितले. मोरकेवाडी येथे मृतावस्थेत मगर असल्याची खबर मिळताच सावंतवाडी वनपाल गजानन पाणपट्टे, आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, श्री. पडते यांनी घटनास्थळी धाव घेत मृत मगरीला पंचनामा करून दहन केले.