
नाणारवरून शिवसेनेत दुफळी..पदाधिकाऱ्यांकडून खुलेआम समर्थन; कोकणचा विकास, तसेच रोजगारासाठी प्रकल्प हवा...
नाणारसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची राजीनामा देण्याची तयारी....
राजापूर (रत्नागिरी) : गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला नाणार आता होणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. त्याचवेळी तालुक्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाई झाली तरी चालेल. मात्र, नाणारचे समर्थन करणार, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. या साऱ्या घडामोडीतून सेनेत नाणारवरून पडलेली दुफळी चव्हाट्यावर आली.
लोकांना प्रकल्प नको, असल्यास आमचा विरोध, आम्ही जनतेसोबत, अशी भूमिका घेत शिवसेनेने नाणार प्रकल्पाला विरोध केला. प्रकल्पविरोधात आंदोलनेही छेडली. मात्र, प्रकल्प विरोधातील झेंडे खांद्यावर घेणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हातामध्ये आता समर्थनाचे झेंडे दिसत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आता खुलेआम प्रकल्पाचे समर्थन केले जात आहे. विकासासह रोजगारासाठी नाणार हवा, अशी आग्रही भूमिंका घेतली जात आहे.
हेही वाचा- दामिनी व्हा ; स्वयंसिद्धाच्या सावित्री, दामिनी की कामिनी
रोजगारासाठी नाणार हवा
बैठका वा मीडियाच्या माध्यमातून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तशी भूमिका बोलून दाखविली आहे. त्यामुळे नाणारबाबत शिवसेनेची भूमिका बदलली की काय, अशी चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज ता. १८ रोजी सिंधुदूर्गामध्ये नाणारबाबत भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट करून या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र, सागवे जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन करीत प्रकल्प व्हावा, अशी आग्रही भूमिका मांडली.
हेही वाचा- पोलिसांच्याच दुचाकी विम्या विना -
नाणारवरून शिवसेनेत दुफळी
त्यासाठी वेळप्रसंगी पदांचा राजीनामा देण्याचीही तयारीही जाहीर बोलून दाखविली आहे. त्यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे नाणारवरून सेनेतील अंतर्गंत दुफळी चव्हाट्यावर आली.दरम्यान, आजपर्यंत प्रकल्प विरोधाचे झेंडे खांद्यावर घेणाऱ्या शिवसैनिकांच्या हातामध्ये प्रकल्प समर्थनाचे झेंडे येण्याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांनी कोकणवासीयांना दिले हे वचन.. -
दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व
नाणार रिफायनरी होत असलेला सागवे जिल्हा परिषद गट असो वा आयलॉग होत असलेला देवाचे गोठणे गट असो, या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे एकहाती राजकीय वर्चस्व आहे. या दोन्ही गटातील जिल्हा परिषद सदस्यांसह प्रत्येकी दोन पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे आहेत. येथील पदाधिकाऱ्यांनी नाणार आणि आयलॉग संबंधित संघटनेविरोधी भूमिका घेतल्याने आणि त्यांच्यावर संघटनेनेने कारवाईचा बडगा उगारल्यास त्याचा फटका भविष्यामध्ये शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.
Web Title: Shiv Sena Split Nanar Project Kokan Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..