esakal | 'याठिकाणी' आले गवा आणि मगरींवर मुर्त्यूचे संकट....

बोलून बातमी शोधा

crocodile death in madura kokan marathi news

मडुरा-मोरकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी सहा फुटी मगर मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दहा फुटी मगर नदीत कुजलेल्या स्थितीत तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

'याठिकाणी' आले गवा आणि मगरींवर मुर्त्यूचे संकट....
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदूर्ग)  : मडुरा-मोरकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी सहा फुटी मगर मृतावस्थेत आढळल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा दहा फुटी मगर नदीत कुजलेल्या स्थितीत तरंगताना आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 
दरम्यान, मगरीच्या तोंडाकडील भागाचा प्राण्याकडून लचका काढल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळगावकर यांनी दोन्ही मृत मगरींच्या जबड्याला जखमा असल्याने झटापटीत दोन्ही मगरींचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात बांदा दशक्रोशीत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे तेरेखोल नदीतील महाकाय मगरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर मडुरा नदीत आल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जिवास धोका निर्माण झाल्याने याची खबर वनविभागास देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक सहा फुटी मगर मृतावस्थेत आढळली होती. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. मगरींच्या संवर्धनाकडे होणारे 

हेही वाचा - रत्नागिरीत दगडांनी ठेचून  या शाळकरी मुलाचा केला खून.....
 

वन्यप्राण्यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह

दुर्लक्ष यामुळे मगरी मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नदी परिसरात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सर्वत्र पाहणी केली असता झाडावेलींच्या विळख्यात मगर कुजलेल्या अवस्थेत दिसून आली. ही मगर दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाल्याचे सांगण्यात येते. वनविभागास सकाळी याची कल्पना देऊनही दुपारपर्यंत कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने याचे गांभीर्यच नसल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा - पन्नास हजाराची खंडणी दे, नाहीतर इथंच वाजवीन गेम म्हणत झाडली गोळी...
 

चार दिवसांत मडुऱ्यात दोन गवे, दोन मगरी असे चार प्राणी मृतावस्थेत आढळल्याने वन्यप्राण्यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, मृत मगरीची माहिती मिळताच आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल साळगावकर, सावंतवाडी वनविभाग अधिकारी घटनास्थळी हजर झाले.

हेही वाचा -  नाणार विरोधकांना परस्पर चपराक; जमीन मालकांची संमतीपत्रे सादर
 

मृत्यू झटापटीत
मडुरा येथे नदीपात्रातील दोन्ही मगरींचा मृत्यू हा झटापटीत झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळगावकर यांनी सांगितले. डॉ. साळगावकर यांनी दोन्ही मगरींचे विच्छेदन केले. दोन्ही मृत मगरींच्या जबड्याला जखमा झाल्या होत्या. झटापटीत जबड्यांचा चावा घेतल्याने धारदार दातांच्या खोलवर जखमा झाल्या होत्या. त्यामुळेच दोन्ही मगरींचा मृत्यू हा झटापटीतून झल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.