देवगड, मालवण, वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी (व्हिडिआे)

अनंत पाताडे
बुधवार, 26 डिसेंबर 2018

 मालवण -  नाताळच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. कोकण समुद्रकिनारे सध्या हाऊसफुल झालेली पाहायला मिळत आहे. देवगड, मालवण आणि वेंगुर्ला येथील समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे.

मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. वॉटर स्पोर्ट तसेच बोटिंगचा देखील पर्यटक मनमुराद आनंद घेताना पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे पर्यटक मालवणला सर्वाधिक पसंती देत आहेत. मालवणमधील चिवला, तारकर्ली, दांडी तसेच देवबाग आदी समुद्र किनारे पर्यटकांनी बहरून गेले आहेत.

दुसरीकडे आंबोली हिल स्टेशनला देखील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. महाबळेश्वर प्रमाणेच आंबोली देखील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. आंबोली मुख्य धबधबा, कावळेसाद, नांगरदास, हिरण्यकेशी, महादेवगड तसेच सूर्यास्त दर्शन आदी पॉईंट पहाण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.

मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात पर्यटक दाखल झाल्याने मालवण, आंबोली, वेंगुर्ला, शिरोडा आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. 

Web Title: A crowd of tourists on the coast of Devgad, Malvan, Vengurla