Konkan Railway Latest News
esakal
खेड/चिपळूण : गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणातील प्रवाशांसाठी मोठा गाजावाजा करत सुरू केलेल्या ‘सीएसएमटी–सावंतवाडी एक्स्प्रेस’च्या पहिल्याच फेरीत रेल्वे प्रशासनाचा सावळागोंधळ पुढे आला. प्रवाशांकडून पूर्ण भाडे वसूल करतानाच गाडीत मूलभूत सुविधांचीच प्रचंड वानवा असल्याचे समोर आले. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.