फलोत्पादन लागवडीला प्रोत्साहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

राजापूर - फलोत्पादन जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून मिळालेल्या मान्यतेचा फायदा घेऊन कोकणात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र दिवाळीनंतरच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये अचानक लागणाऱ्या वणव्यामध्ये बागा जळून शेतकऱ्यांचे फळबागा विकसित करण्याचे स्वप्न भंग पावत आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या बागा वणव्यांमध्ये जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

राजापूर - फलोत्पादन जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून मिळालेल्या मान्यतेचा फायदा घेऊन कोकणात फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे; मात्र दिवाळीनंतरच्या कालावधीमध्ये जंगलामध्ये अचानक लागणाऱ्या वणव्यामध्ये बागा जळून शेतकऱ्यांचे फळबागा विकसित करण्याचे स्वप्न भंग पावत आहे. गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांच्या बागा वणव्यांमध्ये जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

वणव्यांमुळे फळबागा विकसित करण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न जळून खाक होत असताना दुसऱ्या बाजूला नुकसानभरपाई न देता शासनाकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. वणव्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी अनुदान उपलब्ध नसल्याचे कारण शासनाकडून दिले जाते. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्याला नैसर्गिक साधन-संपदेचा वारसा लाभला आहे. जिल्ह्याला राज्य शासनाने फलोत्पादन जिल्हा म्हणूनही घोषित केले आहे. त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंबा, काजू, नारळी यांच्या बागा विकसित केल्या आहेत. दिवसागणिक त्यात वाढ होत आहे. फळबाग लागवडीसाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे अनुदानही उपलब्ध करून दिले जाते. मोठ्या प्रमाणात फळबागा विकिसत होत असताना दुसरीकडे विविध कारणांमुळे उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे बागांना धोका निर्माण झाला आहे.  आगीच्या भक्ष्यस्थानी अनेक बागा पडून त्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबाग लागवडीसाठी अनुदान देताना शासनाकडून वणव्यांमध्ये बागांचे जळून नुकसान झाल्याची भरपाई देण्यासाठी हात आखडते घेतले आहेत. गेल्या चार वर्षामध्ये वणव्यांमुळे नुकसान झालेल्या तालुक्‍यातील शंभरहून अधिक शेतकरी सध्या नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. भरपाई देण्यासाठी शासनाकडून अनुदानच दिले जात नसल्याने ही भरपाई रखडल्याचे बोलले जात आहे. 

फळबाग लागवडीसाठी शासनाकडून शंभर टक्के अनुदान योजनेअंतर्गत अनुदान उपलब्ध करून दिले जाते; मात्र या योजनेतून लागवड केलेली वा खासगीरीत्या लागवड केलेली फळबाग वणव्यामध्ये जळून खाक झाल्यास कोणतीही नुकसानभरपाई  मिळत नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा विचार करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी.

- प्रकाश, शेतकरी

राजापूरातील नुकसानग्रस्त शेतकरी  

वर्ष                      शेतकरी संख्या
२०१२-०१३                        १
२०१३-०१४                        ८
२०१४-०१५                      २७
२०१५-०१६                      ७३
एकूण                             १०९ 

Web Title: Cultivation of Horticultural Promotion