पोलिसांवरील ताण झाला कमी ; घसरला गुन्हेगारीचा आलेख

The curfew reduced the crime graph in ratnagiri
The curfew reduced the crime graph in ratnagiri
Updated on

रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्याने देशाचा आर्थिक पाय खोलात गेला आहे. मात्र या लॉकडाऊनचा जर कोणाला सकारात्मक फायदा झाला असेल तर ते पोलिस दलाला झाला  आहे. संचारबंदीमुळे पोलिस दलाचे काम वाढले असले तरी दोन महिन्यातील गुन्हेगारीचा आलेख चांगलाच घसरल्याने दलाचा ताण कमी झाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात 40 ते 45 टक्के गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला गुन्हेगारीची थोडीशी किनार आहेच. तरी दळणवळणाची साधने वाढल्याने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीशी जिल्ह्याचा थेट संबंध आला आहे. रेल्वे, जलवाहतूक आदींमुळे अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये जिल्ह्याचे नाव किंवा गुन्हेगारांचा समावेश आहे. तरी राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्याचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. अन्य जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याचा वार्षिक क्राईम रेट आहे, तेवढा रत्नागिरी जिल्ह्याचा वार्षिक क्राईम रेट आहे; मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा गुन्हेगारी क्षेत्राला चांगलाच झटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे देश अडचणीत आहे, मात्र दुसरी जमेची बाजू म्हणजे गुन्हेगारी कमी झाली आहे.

45 गुन्ह्यांची घट

 जिल्ह्यात गेल्या वर्षी 2019 ला मार्च महिन्यात खून, खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, बलात्कार, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, गर्दी मारामारी आदी 25 प्रकारचे 167 गुन्हे घडले होते; मात्र लॉकडाऊनमुळे यामध्ये मोठी घट झाली आहे. मार्च 2020 मध्ये 128 गुन्हे घडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 ने गुन्हे घटले आहेत. एप्रिल महिन्यातदेखील तीच परिस्थिती आहे. सुमारे 40 ते 50 टक्के गुन्हेगारीमध्ये घट झाली आहे. भाग 1 ते 6 म्हणजे जुगार, हत्त्यार अधिनियम, जीवनावश्यक वस्तू, दारूबंदी आदी मार्च 2019 ला 126 गुन्हे घडले होते. मार्च 2020 मध्ये फक्त 81 गुन्हे घडले आहेत. म्हणजे 45 गुन्ह्यांची घट झाली आहे.

पोलिस ठाण्यातील ताण झाला कमी

एप्रिलमध्ये देखील 50 टक्क्यांपेक्षा जास्त गुन्ह्यांचे प्रमाण घटले आहे. कोरोनामुळे देशात पोलिसांचे काम वाढले आहे. पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी 12 ते 24 तास रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहे. सर्व थरातून पोलिस दलाचे या बद्दल कौतुक होत आहे. हे काम वाढले असले तरी गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याने त्यांचा पोलिस ठाण्यातील ताण काहीसा कमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com