महिलांनो सावधान ; सायबर गुन्हेगारांचा ग्रामीण भागात होतोय अटॅक

राजेश शेळके
Friday, 11 September 2020

जिल्ह्याची 6 महिन्यातील स्थिती; लॉकडाउच्या काळात 8 जणांची फसवणुक

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळातही चोरट्यांनी पैसे कमविण्याचा पर्याय शोधत जिल्ह्यातील आठ जणांना गंडा घातला. गेल्या सहा महिन्यात कोणताही गंभीर, अतिगंभीर किंवा किरकोळ गुन्ह्यांना आळा बसला. मात्र सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फसवणुक करून सुमारे सव्वा 4 लाख रुपये लुटल्याचे पुढे आले आहे.

जिल्ह्यात हे गुन्हे सावर्डे, खेड, संगमेश्वर, चिपळूण आणि लांजा या ठिकाणी दाखल झाले आहेत. यातील सर्वांत जास्त चार गुन्हे हे चिपळूण येथील आहेत. ऑनलाइन फसवणुकीमध्ये एखाद्या अज्ञात मोबाईल नंबरवरून कॉल येतो आणि बोलणारा मी बँकेतून बोलत असून तुमच्या एटीएम कार्डची सेवा बंद झाली आहे. ते पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी तुमच्या कार्डवरील 16 अंकी नंबर आणि पिन नंबर द्या’ असे सांगतो. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अनेक नागरिक सर्व माहिती देतात आणि काही वेळाने बँक खात्यातून पैसे काढल्याचे मेसेजेस आले की डोक्याला हात लावतात.

हेही वाचा- Photo : रत्नागिरीत  या किनार्‍यावर आहेत नयनरम्य तिन गावे : तुम्ही पाहिली आहेत का...?

आतापर्यंत शहरी भागातील मध्यम आणि उच्च मध्यम वर्गापर्यंत मर्यादित असणार्‍या सायबर गुन्हेगारांनी आपले हातपाय आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरले आहेत. ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी  आर्थिक लूट सुरूच ठेवली आहे. ऑनलाइन बँकिंग, डेबिट, क्रेडिट कार्ड फसवणूक आणि अन्य माध्यमांतूनही गुन्हेगारांनी सामान्यांच्या पैशांवर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे सहज पैसे कमविण्यासाठी सायबर गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांनी घरातच बसून काम करण्यास प्राधान्य दिले. आजही अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहेत. अनेकांचा ऑनलाइन व्यवहार करण्याकडे कल आहे.कॅशबॅकच्या नावाखाली गुन्हेगार ज्येष्ठ नागरिक, महिला यांना लक्ष्य करत आहेत. गुन्हेगारांच्या जाळ्यात तरुणवर्गही अडकत आहे. काही ठिकाणी तर केवायसी अपडेटचेही कारण पुढे करत नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारला आहे. ऑनलाइन बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डद्वारे होणार्‍या फसवणुकीचा आकडा सर्वाधिक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा-महाराष्ट्रात ब्लॅकमॅजीकसाठी या प्राण्याला आहे मोठी मागणी ; होतेय लाखाची उलाढाल

...अशी माहिती देऊ नका

सायबर गुन्ह्यांचा छडा लागण्याचे प्रमाण कमी आहे. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या फोन कॉल्सना बळी न पडता आपल्या बँक खात्याची आणि एटीएमकार्डची माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन सायबर सेलने केले आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cyber ​​criminals embezzled Rs 4.5 lakh 6-month status of the district Fraud of 8 people during lockdown