

Dadar Ratnagiri passenger train closed
ESakal
पूर्वांचलमधील प्रवाशांसाठी एक मोठी पर्वणी म्हणून दादर-गोरखपूर रेल्वे सेवेला नियमित एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना पाठवलेल्या अधिकृत पत्रातून याला दुजोरा देण्यात आला आहे. मात्र यामुळे कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. ज्या गाडीसाठी कोकणवासियांनी लढा दिला ती दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली आहे.