धरण पूर्ण; मात्र कालवे अपूर्ण, डोंगर खचलेले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

रांगव धरणाची स्थिती - ३१० हेक्‍टर सिंचनाखाली येण्याची प्रतीक्षा, समस्या मार्गी लावण्याची मागणी

देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍यातील रांगव येथे लघुपाटबंधारे विभाग ओरसच्या मार्फत बांधण्यात आलेले धरण पूर्ण झाले आहे. मात्र त्याबाबत अनेक समस्या अद्यापही कायम आहेत. धरणावर चौकीदार नाही, रिंगरोडची दुरवस्था झाली आहे. खचलेले डोंगर, पर्जन्यमान यंत्राची दुरवस्था, कालव्यांची कामे अर्धवट, नदीत गाळ साचलेलाच या साऱ्या समस्या मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यातील कडवईजवळ असणाऱ्या रांगव येथे जलसंपदा विभाग कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ ओरसच्या लघू पाटबंधारे विभागातर्फे धरणाचे काम पाच वर्षापूर्वी करण्यात आले. या धरणाच्या कामाला १९९४ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. धरणाची उंची २३.८७ मीटर व लांबी ५५० मीटर आहे. धरणामुळे ३१० हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या धरणाच्या बांधकामासाठी सुमारे पावणेदोन कोटी रुपये एवढा खर्च करण्यात आला आहे. धरणाचे काम पूर्ण झाले असून धरणात ०.१९५ टीएमसी इतका पाण्याचा साठा आहे.

धरणातून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढण्यात येणार आहेत, उजवा कालवा ३.८१ कि.मी.चा तर डावा कालवा ५.६४ कि.मी.चा आहे. या कालव्यांचे खोदकाम करण्यात आले आहे मात्र पुढील कामकाज अर्धवट आहे. कालव्याच्या पाईपलाईनवर चेंबर बांधण्यात आली, मात्र ती उघडी असल्याने यामध्ये गुरांचे पाय अडकून गुरे या चेंबरमध्ये पडण्याची भिती व्यक्‍त होत आहे. या धरणावर क्षेत्रीय चौकीदार नेमण्याची तरतूद आहे; मात्र अद्यापही चौकीदार नेमण्यात आलेला नाही. तातडीने चौकीदार नेमण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. धरणाचे काम पूर्ण मात्र उर्वरित आवश्‍यक ती कामे अपूर्ण राहिल्याने धरणाच्या पाण्याचा काही उपयोग होत नाही व खर्च मात्र झालेला अशी स्थिती आहे.

शेतीत पाणी घुसून नुकसान
कालव्याची कामे अपूर्ण असतानाही रांगव गावाच्या एका बाजूने वाहणाऱ्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. त्यामुळे नदीचे पाणी शेतात घुसून शेतीचे नुकसान होण्याचे प्रकार वाढले आहेत. रिंगरोड लगतचा डोंगर दोन वर्षापासून खचलेला अवस्थेत असून या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्‍यकता आहे. मात्र प्रशासन कोणतीच हालचाल केलेली नाही.

Web Title: dam complete, canal uncomplete