सिंधुदुर्गात बंधाऱ्यांचे 90 टक्के उद्दीष्ट पूर्ण 

dams Construction complete Sindhudurg district
dams Construction complete Sindhudurg district

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यात लोकसहभागातून 6200 कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यानुसार आतापर्यंत 5587 बंधारे बांधून 90.11 टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. कुडाळ तालुक्‍याने सर्वाधिक 1223 बंधारे बांधून 122.23 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. 

जिल्ह्यात एप्रिल ते मे या कालावधीत काही भागात पाण्याची टंचाई भासते. यावर उपाययोजना म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने कच्चे व वनराई बंधारे बांधून पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यावर्षी जिल्ह्यात 6200 बंधारे बांधण्याचे एकूण उद्दिष्ट ठेवून प्रत्येक तालुक्‍याला उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यानुसार आतापर्यंत 2992 कच्चे व 2595 वनराई असे एकूण 5587 बंधारे बांधून पूर्ण केले आहेत. आतापर्यंत 90.11 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे तर जानेवारी अखेर 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे ध्येय प्रशासनाने ठेवले आहे. 

उद्दिष्ट पूर्तता अहवाल 
तालुका.उद्धिष्ट.कच्चे.वनराई.एकूण.टक्केवारी 
कणकवली.1000.741.205. 946.94.60 
कुडाळ.1000.687.536.1223.122.30 
दोडामार्ग.400.201.131.332.83 
वेंगुर्ले.500.315.150.465.93 
मालवण.1000.70.738.808.80.80 
देवगड.900.237.426.663.73.67 
सावंतवाडी.1000.543.292.835.83.50 
वैभववाडी.400.198.117.315.78.75 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com