भाजपच्या प्रचारासाठी दानवेंची आज सावंतवाडीत प्रचार सभा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी ः भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह वरिष्ठ नेते उद्या (ता. 24) येत आहेत. इतरही नेते जिल्ह्यात येणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

सावंतवाडी ः भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह वरिष्ठ नेते उद्या (ता. 24) येत आहेत. इतरही नेते जिल्ह्यात येणार असल्याचे माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री. तेली यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी काका कुडाळकर, प्रथमेश तेली उपस्थित होते. यावेळी श्री. तेली म्हणाले, ""येथील पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार प्रवीण दरेकर उद्या सावंतवाडीत येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता त्यांची येथील जिमखाना मैदानावर सभा होणार आहे. दरम्यान 26 ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील येथील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत.''
श्री. तेली पुढे म्हणाले, ""भाजपला या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी निश्‍चितच पालिकेत आम्हाला यश मिळेल, यात काही संशय नाही. या ठिकाणी गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या सत्ताधाऱ्यांना लोक कंटाळलेले आहेत. त्यामुळे झालेली चूक पुन्हा करणार नसल्याचे लोक सांगत आहेत. शहराच्या विकासासाठी येथील नागरिक भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील यात काही शंका नाही.''

"ती' रोकड नेत्याशी संबंधित?
कोलगाव येथे आढळलेली रोकड येथील एका बड्या राजकीय नेत्याची असल्याचा संशय आहे, असा आरोप करून संबंधित ठेकेदाराची गाडी गेले तीन दिवस त्या नेत्याच्या मागून फिरत होती. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी माजी आमदार तथा भाजपचे नेते राजन तेली यांनी आज येथे केली. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात आज आयोजित करण्यात दुचाकी रॅली लक्षात घेता भाजपला नक्कीच यश मिळणार आहे, असा दावा यावेळी तेली यांनी केला.

Web Title: danve at sawantwadi