दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव नाहीतर.....
दापोली (रत्नागिरी ) : दापोली तालुक्यातील हर्णे बाजारपेठे मधील एक बेकरी व एका राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे रात्री अचानक भीषण आग लागून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीमध्ये प्रचंड प्रमाणात वित्तहानी झाली असून जीवितहानी मात्र झालेली नाही.
दरम्यान, काल रात्री हर्णे बाजारपेठे मधील अझरुद्दीन खालिद महालदार यांची बेकरी व माधव प्रभाकर मयेकर यांचे घर हे अगदी एकमेकाला लागूनच आहे. रात्री साधारण ३:३०च्या दरम्यान अचानक महालदार यांच्या बेकरीमध्ये शॉर्टसर्किट होऊन आतील रूममध्ये आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर कामगारांना कळले. तोपर्यंत ही आग मयेकर यांच्या घरात जाऊन पोहोचली होती. मयेकर यांच्या घरात माधव मयेकर व त्यांच्या पत्नी गाढ झोपेत होत्या. परंतु मयेकर यांच्या पत्नीला जाग आली आणि डोळे उघडताच समोर अग्नितांडव दिसले.त्यांनी थेट मयेकरानां उठवून घराबाहेर धूम ठोकली.
आग लागली म्हणून ओरडा ओरड सुरू केली. तोपर्यंत बेकरीतील कामगारांनी पाणी मारायला सुरुवात केली होती. पण अग्नीने तोपर्यंत रौद्ररूप धारण केले होते. यावेळी दापोली नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत पुसाळकर तातडीने हजर झाले. दापोली नगरपंचायतीचा पाण्याचा बंब बंद पडला होता. त्यामुळे खेड नगरपरिषदे कडून फोन करून पाण्याचा बंब मागविण्यात आला परंतु तो यायला खूप उशीर झाला होता.
अशी लागली आग
दरम्यान, आग लागली आग लागली अशी सगळीकडे ओरड होताच बहुसंख्य ग्रामस्थ आग विझवायला एकवटले. सगळ्या बाजूने पाण्याचा मारा सुरू केला. बहुतांशी ग्रामस्थांनी आशिष मयेकर यांच्या टेरेसवरून पाण्याचा मारा चालू केल्यावर आग पूर्णपणे आटोक्यात आली. आग विझल्यानंतर पाण्याचा बंब हजर झाला. बेकरीमध्ये आग लागली तेंव्हा बेकरीच्या बाहेर दरवाजा बेकरीचा दरवाजा बंद करून कामगार हे बाहेर चहा पीत बसले होते. चहा पिऊन झाल्यानंतर कामगार दरवाजा उघडून आतमध्ये बेकरीत येत असतानाच मोठी आग दिसली तेंव्हा आग लागल्याचे कळले आणि कामगारांनी पाणी मारायला सुरुवात केली आणि आग लागली म्हणून ओरडाओरड केली तेंव्हा आजूबाजूचे ग्रामस्थ गोळा झाले; अशी माहिती बेकरीचे मालक अझरुद्दीन महालदार यांनी दिली.
जीवितहानी टळली
या आगीमध्ये माधव मयेकर यांचे दागिने, पैसे, कपडे,आदी सामान जळून खाक झाले. त्यामुळे त्यांचे एकूण ६,२९,५००/- रुपयांचे तर अझरुद्दीन महालदार यांचे बेकरीतील सर्वच समान या आगीत जळून खाक झाले असल्यामुळे त्यांचे सुमारे ४,२८,२००/- रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अग्नितांडवमध्ये लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून जीवितहानी मात्र टळली आहे. यावेळी घटनास्थळी दापोलीचे नायब तहसीलदार श्री.सुरेश खोपकर, दापोली प.स. चे सभापती रुउफ हजवाने, हर्णे गावचे सरपंच , ग्रामसेवक, तलाठी, हर्णे पोलीस दुरक्षेत्राचे बिट अंमलदार श्री. मोहन कांबळे त्यांचे सहकारी मोहिते, असलम अकबानी, सर्व मयेकर परिवार, बहुसंख्य ग्रामस्थ, सर्व यंत्रणा तातडीने मदतीसाठी हजर झाल्या. सदर घटनेचा हर्णे तलाठी अमित शिगवण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.