दापोलीतील ६४ एसटींमध्ये ‘वाय-फाय’ यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

हिंदी चित्रपट पाहण्यास पसंती - प्रवासी वाढीसाठी फायदेशीर

दापोली - वाढत्या स्मार्ट फोनधारकांच्या संख्येमुळे सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय सुविधा अत्यावश्‍यक झाली आहे. एसटी महामंडळानेही एसटीमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा देण्यास सुरवात केली आहे. प्रवाशांनी त्याद्वारे चित्रपट पाहण्यास पसंती दिली आहे. ऑक्‍टोबरपर्यंत राज्यातील एस. टी.च्या सर्व बसमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे. दापोली आगारात असलेल्या ६८ पैकी ६४ गाड्यांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सुखकर प्रवासासह प्रवाशांची करमणूक व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने बसमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला. त्याचे काम यंत्र मिडीया सोल्युशन कंपनीला देण्यात आले. दोन महिन्यात दापोली आगाराच्या ६४ गाड्यांमध्ये ‘वाय-फाय’ सुविधा बसविण्यात आली आहे. या सुविधेमध्ये प्रवाशांना निवडक मराठी, हिंदी चित्रपटांसह गाणी, कॉमेडी मालिका उपलब्ध करण्यात आल्या असून प्रवासी यातील कोणताही पर्याय निवडून आपल्या मोबाईलवर पाहू शकतात. १०० हिंदी चित्रपट, २० ते २५ मराठी चित्रपट, २० अन्य भाषिक चित्रपट आणि ५ ते ७ मालिकांचा पर्याय प्रवाशांना देण्यात आला आहे. प्रवाशांनी हिंदी चित्रपटांना अधिक पसंती दिली आहे. त्यापाठोपाठ मराठी चित्रपटांसह डब केलेल्या अन्य भाषिक चित्रपटांचा क्रमांक लागतो.  एसटी महामंडळाने संबंधित कंपनीशी पाच वर्षांचा करार केला आहे. या कंपनीकडून महामंडळाला दरवर्षी १ कोटी ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. दिवसाला एका बसच्या प्रत्येक फेरीमागे १० ते १२ प्रवासी या सुविधेचा लाभ घेत आहेत.

एसटी प्रवासात तसेच बसस्थानकावर एसटीची वाट पाहताना वेळ घालवण्यासाठी वाय-फाय सुविधेचा उपयोग होत आहे. एसटीने नवनवीन सुविधा उपलब्ध केल्यास खासगी वाहनाने प्रवास करणारा प्रवासी एसटीकडे आकृष्ट होईल.
- वैभव बहुतुले, दापोली.

Web Title: dapoli konkan wi-fi service in 64 st