दापोली नगरपंचायतीची पंचवीस टक्के वसुली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

दापोली - नोटाबंदीनंतर राज्य सरकारने जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा करासाठी भरणा करून घेण्याचा घेतलेला निर्णय दापोली नगरपंचायतीला फायदेशीर ठरला आहे. मार्चअखेर अगोदरच तब्बल २५ टक्के वसुली करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

दापोली नगरपंचायतीचे घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या स्वरूपात एकूण वार्षिक उद्दिष्ट १ कोटी ३९ लाख ५ हजार ५४ रुपये असून यापैकी नोटबंदीच्या ३७ दिवसांमध्ये तब्बल ३५ लाख १९ हजार ५५६ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा ११ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत स्वीकारण्यात आल्या. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

नगर विकास विभागाने पाचशे आणि एक हजार रुपये मूल्याच्या जुन्या चलनातील नोटा स्वीकारण्याच्या सूचना निर्देश नागरपंचायतींना दिले होते. त्यानुसार ११ ते २४ नोव्हेंबर या १४ दिवसांच्या पहिल्या टप्प्याच्या कालावधीत २९ लाख १२ हजार ६२२ रुपयांची वसुली नगरपंचायतीच्या कार्यालयात झाली. दरवर्षी पाणीपट्टी आणि घरपट्टीच्या वसुलीसाठी वर्ष अखेरीस प्रशासनाला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून मोठी धावपळ करावी लागते; मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे कार्यालयातच कराची रक्कम जमा झाली. या कालावधीत नगरपंचायतीच्या कर विभागाने कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रात्री उशिरापर्यंत कर स्वीकारून नागरिकांना दिलासा दिला. कार्यालयीन वेळेनंतर सुरू असलेल्या करसंकलन केंद्रांत नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत रांगा लावून मिळकत कर भरणा केला. यानंतर मुदतवाढ मिळालेल्या २५ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीतील दुसऱ्या टप्प्यात १ लाख ६६ हजार २९१ रुपयांच्या भरणा झाला. तिसऱ्या आणि अंतिम मुदतवाढ मिळालेल्या ५ ते १५ डिसेंबर या ११ दिवसांच्या अवधीत ४ लाख ४० हजार ६४३ रुपयांचा भरणा नागरिकांनी केला. २५ नोव्हेंबरनंतर केवळ ५०० रुपयांच्या नोटा नरपंचायतीत स्वीकारण्यात येत होत्या.

Web Title: dapoli nagar panchayat