उद्धव ठाकरे आम्हाला राजकारणातून संपवायला निघाले आहेत, आता उद्धव ठाकरेंनाच कोकणातून उद्ध्वस्त करायला वेळ लागणार नाही, अशी कडाडून टीका रामदास कदम यांनी केली.
दापोली : दापोली नगरपंचायतीत (Dapoli Nagar Panchayat) यापुढे शिवसेनेचाच नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरेंसाठी (Uddhav Thackeray) ही चपराक असून, कोकणातून ठाकरे शिवसेनेला उद्ध्वस्त केल्याशिवाय हा रामदास कदम गप्प बसणार नाही, अशी टीका शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केली.