दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी यांचा सभापतिपदाचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

हजवानी हे दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 

दाभोळ  : दापोली पंचायत समितीचे सभापती रउफ हजवानी यांनी पक्षाच्या आदेशानुसार केवळ ८ महिन्यातच सभापतिपदाचा राजीनामा  दिल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. आपण पक्षावर नाराज असून पक्षाचा राजीनामा  दिला असल्याची माहिती  सभापती रउफ  हजवानी यांनी दिली. 

हजवानी हे दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. 
दापोली पंचायत समितीमध्ये  राष्ट्रवादीची सत्ता असून राष्ट्रवादीचे ७ तर शिवसेनेचे ५ सदस्य आहेत. माजी आमदार  संजय कदम  यांनी गेल्यावेळी काढलेल्या तोडग्यानुसार राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांना पंचायत समितीचे सभापतिपद किंवा उपसभापतीपदाचा मान  देण्यात येणार असल्याने ८ महिन्यांचा  कालावधीसाठी हर्णे पंचायत समिती गणातील सदस्य रऊफ  हजवानी यांना पंचायत समितीचे  सभापतिपद देण्यात आले.  मात्र आठ महिन्याचा  कालावधी संपल्यावर त्यांना राजीनामा  देण्यास सांगण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे. 

आपल्याला काम  करण्यासाठी आठ महिन्यांचा पुरेसा कालावधी मिळालेला  नसून त्यातील चार महिने  कोरोनातच गेल्याने आपल्याला मनाप्रमाणे काम  करता आले नाही. पक्षाने आपल्याला राजीनामा  देण्यास सांगितल्याने आपण पदाचा राजीनामा  दिला असून आता आपण पक्ष सोडण्याचा विचार करत आहे. अन्य पक्षात जाण्याचे पर्यायही आपणास खुले आहेत. मात्र  पंचायत समिती  सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाही असे  हजवानी यांनी सांगितले. लवकरच आपण पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका  स्पष्ट करणार आहोत असेही ते म्हणाले.

आता सभापतिपदासाठी गिम्हवणे पंचायत समिती  गणातील सदस्य योगिता बांद्रे व पंचायत समितीच्या  उपसभापती ममता शिंदे यांची नावे चर्चेत आहेत.

हे पण वाचा...अन्यथा राज्य सरकारशी संघर्ष अटळ ; मराठा समाजाचा इशारा

आपल्याला दापोलीचे माजी आमदार संजय कदम  यांनी सांभाळून घेतले आहे. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या काही सल्लागारांसमोर  त्यांचेही काही चालत नसल्याचे हजवानी यांचे म्हणणे आहे. हजवानी हे शिवसेनेत जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

हे पण वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून केला साजरा

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dapoli Panchayat Samiti Chairman Rauf Hajwani resigns