बांगलादेश सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचास मूकसंमती देताना दिसून येत आहे.
सावंतवाडी : बांगलादेशात (Bangladesh Violence) हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टर पंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत. या विरोधात जागतिक मानव हक्कदिनी मंगळवारी (ता. १०) सिंधुदुर्गनगरीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बांगलादेश हिंदू न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेत जिल्ह्यातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले आहे.