आैरंगाबाद, शिरोडा, आंबोली येथे टुरिझम पोलिस देणार - केसरकर

आैरंगाबाद, शिरोडा, आंबोली येथे टुरिझम पोलिस देणार - केसरकर

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात आंबोली, शिरोडा आणि मालवण येथे टुरिझम पोलीस ही नवीन संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच औरंगाबाद या पर्यटन जिल्ह्यात देखील टुरिझम पोलीस देणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.  

केसरकर म्हणाले की या पोलिसांना सॉफ्ट स्किल म्हणजे वेगवेगळी भाषा शिकवली जाते, वेगळं ट्रेनिंग दिले जाते. ड्रेस कोड वेगळा दिला जातो. पर्यटकांनाशी सौजन्याने कसे वागता येईल .याचे तंत्र भारत सरकारच्या पर्यटन खात्याकडून देण्याचं प्रयत्न करण्यात येणार आहेत.

गोवा भागातून काही अपप्रवृत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळी येऊ नयेत यासाठी टुरिझम पोलिस संकल्पनेचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिस वसाहती आणि पोलीस स्टेशन आधुनिक करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. 

- दीपक केसरकर

दरम्यान,  पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचा आदर व आधार वाटला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज शरद कृषि भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले.

जिल्ह्यातील पोलीस दलाची सर्व कार्यालये व पोलीस ठाणे यांनी आयएसओ 9001-2015 व स्मार्ट पोलीस मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनांच्या वितरण सोहळ्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

व्यासपीठावर कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पल पोलीस अधीक्षक निमित गोयल, सोल ग्रुपचे समिल रुपलाग व सौ रुपलाग उपस्थित होते. 

यश मिळवणे सोपे असते पण ते टिकवणे अवघड असले असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, ""सर्व पोलीस दलाने मेहनत करुन आयएसओ मानांकन मिळविली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन पण, ही मिळवलेली मानांकने कायम राखण्यासाठी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदैव प्रयत्नशिल राहिले पाहिजे. सिंधुदुर्ग हा शांत आणि सुसंस्कृत लोकांचा जिल्हा आहे. त्यामुळे पोलीसांनी नागरिकांशी सुसंवाद साधावा. त्यांच्यामध्ये पोलीसांविषयी विश्वास निर्माण करावा यासाठी काम करावे. जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीस लागत आहे. या पर्यटनासोबतच काही गुन्हेगारी प्रवृत्ती व मादक द्रव्यांचा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी पोलीसांनी सजग रहावे. पोलीस पाटील हे पोलीसांचे गाव पातळीवरील प्रतिनिधी आहेत. शासनाचे डोळे म्हणून ते गावांमध्ये काम करत असतात. गुन्हे रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांनी सदैव कार्यरत असावे.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com