अधिकाऱ्यांच्या अनास्थेने कामे रखडली - केसरकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

सावंतवाडी - जिल्ह्यासाठी करोडो रुपयांचा निधी दिला; मात्र अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळे हा निधी खर्च झाला नाही, अशी खंत व्यक्त करीत आता ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हा जिल्हा दत्तक घ्यावा. आपण सहा महिन्यात रखडलेली कामे पूर्ण करू, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.

सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे उद्‌घाटन सायंकाळी श्री. पाटेकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते. नगराध्यक्ष बबन साळगावकर व्यासपीठावर होते.

दीपप्रज्वलनाने महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. श्री. केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्याच्या विकासासाठी मी आजपर्यंत करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला; मात्र जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची मानसिकता नसल्यामुळे निधी खर्च झाला नाही, याची खंत वाटते; परंतु आता कोकणचे पुत्र म्हणून नाना पाटेकर यांनी सहा महिन्यासाठी जिल्हा दत्तक घ्यावा आणि ही रेंगाळलेली कामे पूर्ण करून घ्यावीत. सावंतवाडी शहराचा विकास होण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संत गाडगेबाबा यांच्या नावाने उभारण्यात येणारी भाजी मंडई ही दोन कामे पूर्ण करण्यासंदर्भात माझे प्रयत्न सुरू राहतील. येत्या चार ते पाच महिन्यांत मोनोरेल प्रकल्प साकारलेला दिसेल. एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून माझा कान पकडण्याचा पाटेकर यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांनी कधीही मला सूचना कराव्यात.’’

पालकमंत्री केसरकर यांच्या काळात जिल्ह्याचा विकास झाला. सरकारने त्यांना मोठे मंत्री पद द्यावे आणि भविष्यात आणखी या भागाचा विकास होईल, यात काही शंका नाही. गोव्यापेक्षा येथील समुद्रकिनारे आणि वातावरण सुंदर आहे. त्यामुळे या भागाचा विकास होणे गरजेचे आहे.

- नाना पाटेकर

या वेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी जयंत जावडेकर, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, सभापती पंकज पेडणेकर, राजेश गुप्ता, परिमल नाईक, आनंद नेवगी, मनोज नाईक, अर्चना घारे, बाबू कुडतरकर, उदय नाईक, राजू बेग, डॉ. जयेंद्र परुळेकर, गजानन भोसले, दीपाली सावंत, दीपाली भालेकर, अनारोजीन लोबो, समृद्धी विरनोडकर, श्‍यामराव सावंत, अफरोज राजगुरू, उत्कर्षा सासोलकर आदी उपस्थित होते. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रास्ताविक केले. उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावर यांनी आभार मानले.

Web Title: Deepak Kesarkar comment