महाआरतीने नाणार रद्द होणार नाही

महाआरतीने नाणार रद्द होणार नाही

देवगड - रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांसोबत शिवसेना असेल. केवळ महाआरती करून प्रकल्प रद्द करता येत नाही, अशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्वाभिमान पक्षाचे नाव न घेता खिल्ली उडवली. विकासकामाला कायम विरोध करून स्थानिकांचे नुकसान करण्याचे काम सुरू असल्याची टिप्पणी करून एकदा हरवून पुरे झाले नसल्याने त्याची पुनरावृत्ती येत्या निवडणुकीत करू, टोलाही त्यांनी लगावला.

तालुक्‍यातील मणचे येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी पालकमंत्री केसरकर बोलत होते. मंचावर शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, युवासेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, ॲड. प्रसाद करंदीकर, ॲड. हर्षद गावडे, शैलेश भोगले, विष्णू घाडी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांचा सन्मान केला. काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘रिफायनरीबाबत शिवसेना स्थानिकांसोबत असेल. पक्षप्रमुखांचीही प्रकल्पविरोधी भूमिका आहे. केवळ महाआरती करून प्रकल्प रद्द करता येत नाही. त्यासाठी प्रकल्प रद्दची अधिसूचना काढावी लागते आणि हे काम शिवसेनेचे उद्यागमंत्री करतील. आजवरच्या पालकमंत्र्यांपेक्षा सर्वाधिक निधी तालुक्‍याबरोबरच जिल्ह्यातील रस्त्यांना दिला, मात्र विरोध करून विकासकामे होऊ दिली जात नाहीत. रस्त्याची कामे करण्यासाठी परदेशी कंपन्या आणू, पण सिंधुदुर्गात बदल घडवू. एकदा जनतेने घरी बसवले असून, त्याची पुनरावृत्ती येत्या निवडणुकीत करू. याची सुरवात येथील आमदार बदलून करू. येथील नगरपंचायतीला सुमारे तीन कोटींचा निधी देऊनही साधे नावही घेतले जात नाही. त्यामुळे भविष्यात निधी देताना विचार करू.’’मुटाट येथील रघुनाथ लेले हायस्कूलच्या सभागृहाचे उद्‌घाटन श्री. केसरकर यांच्या हस्ते झाले.

अतिथीशिलता ठेवून पर्यटनातून आर्थिक समृद्धी आणता येईल. स्थानिक युवकांना रोजगारासाठी पर्यटन गरजेचे आहे. पर्यटनातून आर्थिक समृद्धीचा चमत्कार घडू शकतो. काथ्या उद्योगातून आर्थिक बदल होण्यास मदत होणार असल्याने मागणी असल्यास युनिट देऊ. मणचे खाडीत हाऊसबोट सुरू करणार आहे.
- दीपक केसरकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com