मंत्रीपदासाठीच 'हे' आमदार करताहेत राणेंवर टिका

Deepak Kesarkar Criticism On Narayan Rane For Ministry
Deepak Kesarkar Criticism On Narayan Rane For Ministry

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग )  - येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्‌द्‌यावर लढवणार असून ही निवडणूक राणे विरुद्ध केसरकर अशी आम्हाला करायची नाही; मात्र तरीही केसरकर राणेवरच टीका करत आहेत. राणेंवर टीका करून मंत्रीपद पदरात मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे, असा टोला आज येथे पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी लगावला.

यावेळी संजू परब, सुधीर आडीवरेकर, प्रसाद अरविंदेकर, दिलीप भालेकर, आनंद नेवगी, मोहिनी मंडगावकर आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ""आंब्रडमध्ये भाजपचा विजय मोठ्या मताधिक्‍याने झाला. त्याअगोदर बांदा निवडणूक जिंकली. अशी विजयाची घोडद्दौड सुरू असताना संजू परब यांनी फॉर्म भरला, त्यानंतर आम्ही विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या 30 डिसेंबर नंतर सावंतवाडीचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल. आमच्या प्रश्नाला उतर, देतांना आमदार केसरकर यांची जी पत्रकार परिषद झाली. त्यात त्यांनी जी भाषा वापरली आणि व्यक्तव्य केले. द्वेषाने आणि रागाने घेतलेली पत्रकार परिषद होती. ज्या केसरकरना मी ओळखतो ते काल मला त्यांच्या बोलण्यावरून दिसले नाहीत. किंबहुना दोन महिने अगोदर आशिष शेलार यांच्या सोबत प्रहार भवनला केसरकर माझ्या बरोबर होते, ते प्रेमळ व भाऊ असल्या सारखे वागवणारे असे होते, मात्र कालच्या पत्रकार परिषदेत नंतर ते केसरकर खरे नव्हते. यामागचे कारण त्याना मंत्रिपद न मिळाल्याचा राग त्यांच्या मनात होता. ते वैफल्यग्रस्त दिसून आले. या मंत्रीमंडळात ते मंत्री होणार नाहीत, या गोष्टीचा राग त्यांनी काल व्यक्त केला. कुठलाही व्यक्ती मंत्रीपदावर आयुष्यभर राहत नाही, गेली 5 वर्षे त्यांनी मंत्रिपद भोगले आहे. आता त्यांच्या अन्य सहकार्यांना मंत्रिपद मिळत असेल तर त्यांनी त्याच स्वागत केलं पाहिजे.''

विकास काय केला याच्या फाईली प्रथम उघडा

ते पुढे म्हणाले, ""आमच्या फाईल निश्चित उघडा पण; त्या अगोदर या शहरासाठी तुम्ही जो काय विकास केला त्या फाईली उघडून जनतेच्या समोर ठेवा. जेणेकरून 20 वर्षे तुम्ही या शहराचे नेतृत्व केल्यानंतर नेमकं त्या फाईलमध्ये जनतेला काय मिळालं याचा हिशोब चुकता होईल. आम्ही विकासाचे व्हिजन घेऊन जनतेसमोर जातो, मग जनतेला ओळखू दे, परखु दे, या शहराला कोण आकार देऊ शकतो हे सुद्धा जनतेलाच कळू दे.'' 

जनता योग्य व्यक्तीला नगराध्यक्षपदी बसवेल

आमच्या संजू परब यांना निवडून दिल्यानंतर जनतेने आमच्याकडून काय अपेक्षा ठेवावी याचा आराखडा घेऊन जनतेसमोर जाऊ. सावंतवाडी पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष बसला तर देवगडमधील कंटेनर थिएटर नगर पालिकाच्या मदतीने उभे करेन असे यावेळी श्री राणे यांनी जाहीर केले. केसरकरांना 20 वर्षे दिलीत, तशी आम्हाला फक्त दोन वर्षे द्या, येथील जनता सुज्ञ आहे. ही जनता योग्य व्यक्तीला नगराध्यक्षपदी बसवेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.

चित्रपटगृह उभारणार

या शहरात मनोरंजन साधन नाही, कुटुंबांना चित्रपट दाखवत येत नाही. चित्रपट बघण्यासाठी गोवा, कणकवलीला जावं लागतं हे दुर्दैव आहे. केसरकर यांनी घोषणा केली होती की, लवकरच मी चित्रपट गृह बांधेन,पण आज त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. येत्या निवडणुकीत संजू परब नगराध्यक्ष झाले आणि आम्हाला संधी दिली तर 1 मे 2020 पर्यत सावंतवाडीकर शहरात राहून त्यांचा पहिला चित्रपट बघतील असे आश्वासन देतो. असेही राणे म्हणाले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com