esakal | केसरकर म्हणाले, राणेंनी सावंतवाडीत यायचे धाडस करू नये 

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar Criticism On Narayan Rane In Sawantwadi

नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी ज्यांनी नाव दोन महिन्यांपुर्वी सावंतवाडी शहरात सामाविष्ट करून घेतले. त्यांची या शहराशी किती बांधीलकी आहे, याचा विचार त्यांनी करावा, अशी टिकाही त्यांनी संजू परब यांचे नाव न घेता श्री. केसरकरांनी केली.

केसरकर म्हणाले, राणेंनी सावंतवाडीत यायचे धाडस करू नये 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्ष निवडणूक ही बाबू कुडतरकर विरूद्ध संजू परब, अशी आहे. त्यामुळे राणेंनी या शहरात येण्याचे धाडस करू नये. ते जेवढ्या वेळा या शहरात येतील तेवढी त्यांची मते कमी होतील, अशी टीका माजी मंत्री दीपक केसरकर यांनी येथे करत ही निवडणूक राणे विरूद्ध केसरकर, अशी होऊ देणार नाही. या आमदार नितेश राणे यांच्या वक्‍तव्याचा समाचार घेतला. 

नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी ज्यांनी नाव दोन महिन्यांपुर्वी सावंतवाडी शहरात सामाविष्ट करून घेतले. त्यांची या शहराशी किती बांधीलकी आहे, याचा विचार त्यांनी करावा, अशी टिकाही त्यांनी संजू परब यांचे नाव न घेता श्री. केसरकरांनी केली. येथील श्रीधर अपार्टमेंट या निवासस्थांनी श्री. केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उमेदवार बाबु कुडतरकर, वसंत उर्फ अण्णा केसरकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा - धक्कादायक ! बापाचा खून करून मुलगा पोलिस ठाण्यात हजर 

उद्देश सफल न झाल्याने राणे वैफल्यग्रस्त

श्री. केसरकर म्हणाले, ""ज्या उद्देशामुळे ते भाजपमध्ये गेले तो त्याचा उद्देश सफल न झाल्याने ते वैफल्यग्रत झाले आहेत. त्यामुळे काहीही बोलत आहे. अगदी छोट्या छोट्या निवडणुका जिंकल्या तरी ते चार चार तास मिरवणुका काढत आहेत; मात्र याठिकाणी शांतता राखणे हा आमचा अजेंडा आहे. त्यामुळे आम्ही आताच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की कुठल्याही परिस्थितीत ही निवडणुक सावंतवाडीच्या परंपरेला साजिशी ही निवडणुक झाली पाहिजे.'' 

कंटेनर सिनेमागृहाची कल्पना न रूजणारी

केसरकर म्हणाले, ""सिनेमागृह हा स्वत:चा व्यक्‍तिगत व्यवसाय आहे. ज्यावेळी आमच्या वडीलांनी येथे सिनेमागृह बांधले त्यावेळी संपुर्ण कोकणातील चांगले सिनेमागृह म्हणुन नावाजलेले होते. आज त्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्याचा प्रस्ताव तयार करतो. त्यात मॉल आणि अस्तित्वात असलेले सिनेमागृह असा समावेश आहे. त्यामुळे संस्थानकालीन वारसा असलेल्या इथल्या जनतेला कंटेनर सिनेमागृहाची कल्पना रूजू शकणार नाही. त्यांना आलीशान सिनेमागृहात बसण्याची सवय आहे. '' 

हेही वाचा - आर. आर. आबांच्या लेकीला पुत्ररत्न ! 

१८ रोजी महाआघाडीच्या उमेदवाराची घोषणा

सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूक ही महाविकास आघाडीच्याच माध्यमातून लढविणार, असे जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या 18 ला महायुतीचा एकच उमेदवार जाहीर होईल, अशी खात्री आहे. शिवाय इतर पक्षाचे वरिष्ठ नेते शिवसेनेच्या उमेदवाराला पाठींबा देतील, असा विश्‍वासही आहे; मात्र नगराध्यक्ष निवडणूक लढविण्याठी ज्यांनी येथे नाव दोन महिन्यांपुर्वी आणले त्यांची या शहराबद्दल काय सहानभुती आहे याचा त्यांनी आधी विचार करावा. 

राणे जेवढ्यावेळा येतील तेवढी त्यांची मते घटतील

माझ्या गृहराज्यमंत्रीपदाच्या काळात एकही दंगल करण्याची संधी ज्या प्रवृतीला करू दिली नाही, ती प्रवृत्ती यावेळी सावंतवाडी शहरात येऊ पाहत आहे; मात्र ज्या ज्या वेळी राणे या शहरात येतील तेवढी त्याची मते कमी होतील. त्यामुळे त्यांना सहानभुतीपर आवश्‍यक मते येथे घ्यायची असतील या शहरात येऊ नये. आल्यास त्याच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे, असे केसरकर म्हणाले.  कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याचा मान राखुन ही निवडणुक लढविली जाणार आहे. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर हे सुद्धा आपला अर्ज मागे घेत या निवडणुकीत सहभागी होतील, अशी आशा आहे. त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेणार असल्याचे श्री. केसरकर म्हणाले. 
 

229 कोटींची विकासकामे 

केसरकर म्हणाले, ""मी केलेला विकास लिखित स्वरूपात जनतेपर्यंत पोचविला आहे. त्यामुळे त्याच्या वेगळ्या फाईल उघडण्याची गरज नाही. माझ्या निवडणुकीवेळी या शहरासाठी कीती निधी दिला व किती कामे केली याची यादी दिली आहे ती राणेंनी वाचावी. ती कामे 229 कोटींची आहेत. ती काही कामे सुरू आहेत तर काहींची टेंडर सुरू आहे. या कामात दहा कोटी रूपये हे केवळ मळगाव रेल्वे टर्मिनससाठी दिलेले आहेत. त्यामुळे शहराचा विकास कसा करायचा हे आम्हाला माहित आहे.''