धक्कादायक ! बापाचा खून करून मुलगा पोलिस ठाण्यात हजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Son Kills Father Incidence In Manjarwadi Kolhapur

मांजरवाडी (ता. करवीर) येथे वीर कुटुंब राहते. धनाजी गोपाळ वीर यांचा 4 डिसेंबरला रात्री उशिरा राहत्या घरी मृत्यू झाला. घरच्यांनी त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कारही केले.

धक्कादायक ! बापाचा खून करून मुलगा पोलिस ठाण्यात हजर

कोल्हापूर -  मांजरवाडी (ता. करवीर) येथे बापाचा गळा आवळून मुलाने खून केल्याची घटना घडली आहे. याची कबुली देत मुलगा करवीर पोलिसात हजर झाला. अर्जुन धनाजी वीर (वय 28) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याने वडीलांची व्यसनीवृत्ती, बॅंकेतून 50 लाखांचे काढलेल्या कर्ज आणि दररोजच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून हे कृत्य केल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली. धनाजी गोपाळ वीर (वय 54) असे मृत वडीलांचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मांजरवाडी (ता. करवीर) येथे वीर कुटुंब राहते. धनाजी गोपाळ वीर यांचा 4 डिसेंबरला रात्री उशिरा राहत्या घरी मृत्यू झाला. घरच्यांनी त्यांच्यावर तातडीने अंत्यसंस्कारही केले. दरम्यान गावात याबाबत चर्चा सुरू झाली. त्याच दरम्यान पोलिस ठाण्यात वीर यांच्या अचानक मृत्यूबाबत निनावी पत्रही प्राप्त झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. दरम्यान काल दुपारी वीर यांचा मुलगा अर्जुन वीर (वय 28) हा करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पोलिसांसमोर बापाचा (धनाजी वीर) खून केल्याची धक्कादायक कबुली दिली. 

हेही वाचा - निपाणी येथे गॅस गळतीने आग; पाच जण गंभीर जखमी 

घरात वडील धनाजी वीर, भाऊ भिमराव व आई असे चौघे राहत होतो. वडील धनाजी वीर यांना सिगारेट व गांजाचे व्यसन होते. त्यांनी वेगवेगळ्या बॅंकेतून 50 लाखांचे कर्ज काढले होते. ते व्यसनावर पैसे खर्च करत होते. कर्जाची परत फेड ते करत नव्हते. ते आई व भावाचा शारीरिक मानसिक छळ करत होते. भावासह माझ्या लग्नाचा विषय काढला की त्याला विरोध करत होते. त्यांच्या अशा तिरसट स्वभाला मी कंटाळून गेलो होते. त्यांच्या त्रासातून एकदाची सुटका व्हावी, यासाठी राहत्या घरात 4 डिसेंबरला नाका तोंडावर मारहाण करून दोन्ही हाताने गळा दाबून खून त्यांचा खून केला. हा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी अंत्यविधी करून पुरावा नष्ट केल्याची कहाणी संशयित मुलगा अर्जुन वीरने पोलिसांना सांगितली. त्यानुसार त्याच्यावर स्वतःच्या वडीलांच्या खूनाचा गुन्हा नोंद करून त्याला अटक केली. याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे करीत आहेत. 

हेही वाचा - VIDEO : गडहिंग्लजला रंगली देखणी म्हैस स्पर्धा; कोण जिंकले ? वाचा 

फिर्यादी व संशयित आरोपी एकच... 

बापाचा गळा आवळून खून केल्याची कबुली मुलाने दिली. तसा कबुली नामा लिहून दिला. त्यामुळे या गुन्ह्यात तोच फिर्यादी व संशयित आरोपी ठरला. असा प्रकार बऱ्याच वर्षांनी घडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Web Title: Son Kills Father Incidence Manjarwadi Kolhapur District

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapur
go to top