esakal | मंडणगडातील जंगलांचा वृक्षतोडीने ऱ्हास
sakal

बोलून बातमी शोधा

ratnagiri

मंडणगडातील जंगलांचा वृक्षतोडीने ऱ्हास

sakal_logo
By
सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मानवी जीवनाला पूरक पण,तालुक्याची भौगोलिक रचना येथील मानवी जीवनाला पूरक अशी आहे; मात्र काही वर्षांपासून येथील नैसर्गिक वातावरण बिघडू लागले असून, त्याचा थेट परिणाम कृषी उत्पादनावर जाणवू लागला आहे. मुसळधार पावसात अनेक डोंगरावरील माती खचून खाली आली आहे. जमिनीला भेगा पडण्याच्या घटनेत वाढ होत आहे. पावसाचे प्रमाण, तापमानातील चढउतार, वन्यजीवांचे नष्ट होणारे अधिवास, याला ही वृक्षतोड कारणीभूत ठरली आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होऊ लागला आहे. २४ ते ३७ अंश स्थिर राहणारे तापमान आता ४२ अंशापुढे गेल्याचे चित्र आहे.

किटातोडचे ग्रहण लागले

तालुक्याला निसर्गाने भरभरून नैसर्गिक साधनसंपत्ती दिली आहे. शासनदरबारी डोंगरी म्हणून नमूद असलेल्या या डोंगराळ तालुक्याला किटातोडचे ग्रहण लागले. त्यात अनेक डोंगर, जंगले वृक्षतोडीने बकाल होत आहेत. शेकडो टन लाकूड रात्री व पहाटे मुंबई, पुणेसारख्या शहरासह परराज्यात वाहतूक केली जात आहे. शेतकऱ्यांच्या जागेतील अनेक जुनी आणि उपयोगी झाडे तुटपुंजा किंमतीला खरेदी करून त्याची किट्याच्या नावाखाली तोड केली जात आहे.

हेही वाचा: शिरोड्याची ऐतिहासिक ओळख सांगणारी मिठागरे अडचणीत

वनक्षेत्र कमी तरीही लगाम नाही

तालुक्यातील अवर्णनीय निसर्गसंपदा जलदगतीने नष्ट होत असल्याने अल्पावधीतच त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत. राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबविली जात असताना मंडणगड तालुक्यात वृक्षतोडीचे विदारक चित्र पुढे आले आहे. तालुक्याचे वनक्षेत्र कमी असल्याचा निर्वाळा वनविभागाच्यावतीने देण्यात येतो; मात्र वृक्षतोडीला लगाम घालण्याचे कर्तव्य साधताना दिसत नाहीत. चेकनाके नसल्याने अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले असून दिवसाढवळ्या लाकूडवाहतुक सुरू आहे.

फळ पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र ८२४५ हेक्टर, लागवड योग्य असूनही पडीक क्षेत्र ४७२०.२१ हेक्टर तर लागवडीस अयोग्य पडीक क्षेत्र ६५६७.९४ हेक्टर आहे. या पडीक क्षेत्रावर असणारी जंगले तालुक्याचा पर्यावरण समतोल साधत असून तीच नष्ट करण्याचे काम किटा तोडीच्या माध्यमातून होत असल्याने भविष्यात त्याचे दुष्परिणाम जाणवणार आहे.

मंडणगड तालुक्यातील निसर्गसंपन्न डोंगर परिसरात भर पावसाळी वातावरणात प्रचंड वृक्षतोड होत आहे. अवैध लाकूडचोरीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला असून रस्त्यालगतची अनेक घनदाट जंगले किटातोडीमुळे उघडी पडू लागली आहेत. त्यामुळे वनक्षेत्र कमी असणाऱ्या तालुक्यातील जैवविविधता नष्ट होत असल्याने पर्यावरण अभ्यासक चिंतेत आहेत. मात्र, वनविभाग व किटा व्यावसायिकांना याचे काहीच सोयरसुतक नाही. ही लाकूडतोड निसर्गाच्या मुळावर आली आहे.

- सचिन माळी, मंडणगड

हेही वाचा: Ratnagiri: भाट्ये नारळ संशोधन केंद्राची कोटीची झेप

दृष्टिक्षेपात

 • डोंगर बोडके, जमिनीची धूप, भूस्खलन

 • फक्त वृक्षतोड नवीन लागवड नाही

 • जैवविविधता होतेय नष्ट

 • वातावरणाचा समतोल बिघडला

 • पावसाच्या सातत्यावर परिणाम

एक नजर..तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र

 1. ४२ हजार ५७३ हेक्टर

 2. पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र ५९४७.४५ हेक्टर

 3. फळ पिकाखाली सर्वसाधारण क्षेत्र ८२४५ हेक्टर

 4. पडीक क्षेत्र

 5. ४७२०.२१ हेक्टर

 6. लागवडीस अयोग्य पडीक क्षेत्र ६५६७.९४ हेक्टर

 7. वृक्षतोडीने तापमान गेले आता ४२ अंशांपुढे

loading image
go to top