

कोकणात अतिवृष्टी व पुरामुळे भातपिकाचे मोठे नुकसान, पण पंचनामे होत नसल्याने शेतकरी संतप्त.
esakal
Konkan Agriculture News : शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास मुसळधार पावसाने हिरावून घेतला आहे. जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, सततच्या पावसामुळे नुकसानीची तीव्रता आणखी वाढणार आहे. दरम्यान, कृषी विभागाकडून केवळ १३०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. पंचनामे धीम्या गतीने सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.