कठुआ, उन्नाव प्रकरणी आरोपींना फाशी देण्याची मागणी

अमित गवळे
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पाली (रायगड) : कठुआ व उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 23) भा. रि. प बहुजन महासंघाच्या वतीने पाली सुधागड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच बलात्कार प्रकरणातील अारोपींना फाशीची मागणी करण्यात आली.

पाली (रायगड) : कठुआ व उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 23) भा. रि. प बहुजन महासंघाच्या वतीने पाली सुधागड तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. तसेच बलात्कार प्रकरणातील अारोपींना फाशीची मागणी करण्यात आली.

भा.रि.प बहुजन महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष दिपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कठुआ आणि उन्नाव बलात्कार घटनेचा निषेध दर्शविण्यात आला अाहे. यावेळी मंगेश वाघमारे म्हणाले की भा.ज.प प्रणित सरकारच्या काळात राज्य व देशातील युवती महिला तसेच मागास घटकांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखण्याच्या दृष्टीने सरकारने योग्य ती पावले उचलणे गरजेचे अाहे. तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की कठुआ व उन्नाव प्रकरणाने संपुर्ण देश हादरुन निघाला आहे. मागील काही दिवसात अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या मानवतेला काळीमा फासणार्‍या अमानूष घटना घडल्या आहेत. कठुआ येथील 8वर्षाच्या निरागस बालिकेवर झालेला बलात्कार आणि खुन प्रकरण अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेतील आरोपींचा जलद शोध घेवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. व पिडीत निरागस मुलीला मृत्यूनंतर न्याय द्यावा अशी मागणी भा.रि.प बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात आली.

निवेदन देतेवेळी भा.रि.प बहुजन महासंघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मंगेश वाघमारे, ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण जाधव,भा.रि.प बहुजन महासंघाच्या सुधागड तालुका महिला अध्यक्षा सुरेखा जाधव तसेच लक्ष्मण वाघमारे, सखाराम जाधव, निषा शिर्के, ज्ञानेश्वर घोगरकर, राम वाघमारे, संजय पवार आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणी भा.रि.प बहुजन महासंघाचे वतीने देण्यात आलेल्या निवदेनाचा गांभीर्यपुर्वक विचार करुन सदर निवेदन पुढील कार्यवाहीकरीता तत्काळ जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविले जाणार असल्याचे तहसिलदार बि.एन. निंबाळकर यांनी सांगितले.

Web Title: demand for hanging of accused in the Kathua, Unnao rape case