प्राथमिक आरोग्य केंद्र नावापुरतेच ; दोन एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱी आहेत पण....

Demand health center renovation work be undertaken immediately
Demand health center renovation work be undertaken immediately

खेड (रत्नागिरी) : तालुक्यातील शिव बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र गैरसोयींच्या गर्तेत अडकले असून सुविधांअभावी रूग्णांची हेळसांड सुरू आहे. याठिकाणी नियुक्त वैद्यकीय अधिकारी केवळ नावापुरतेच उरले असून लाखो रूपये खर्चुन उभारलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील शोभेची बाहुलेच बनले आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावातील २१ हजाराहून अधिकजणांना रूग्णसेवा देण्यात येते. रूग्णसेवेसाठी उभारलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधांची वानवाच आहे. उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना बसण्यासाठी कुठलीच व्यवस्था नसल्याने रुग्णांना बाहेरच बसावे लागत आहे. पाण्याचाही थांगपत्ता नाही. रूग्णालयातील बेडचीही दुरवस्था झाली असून त्यावर चादरही नसल्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे.

रूग्णालयात दोन एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनियमितपणामुळे उपचारासाठी येणाऱ्या सम्णांना तिष्ठत बसावे लागत आहे. ग्रामस्थांनी आरोग्य केंद्रातील नानाविध समस्यांचा पाढा प्रशासनाकडे वाचूनही अद्याप ही बाब प्रशासनाने गंभीरपणे न घेतल्याने रूग्णांची सुरू असलेली हेळसांड कायमच आहे. १९८५ मध्ये बांधलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे १७ गावातील रुग्णांना लाभ होत होता. मात्र आरोग्य केंद्राच्या दुरूस्तीकडे सातत्याने दुर्लक्षच करण्यात आले.

परिसरातील ग्रामस्थांच्या रेट्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला सवड मिळाल्यानंतर केंद्राच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. मात्र ८ ते ९ महिन्यांपासून हे कामही पूर्णपणे ठप्प आहे. यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र नावापुरतेच उरले आहे.आरोग्य प्रशासनाने याकडे गांभियनि लक्ष देवून सोयीसुविधांच्या उपलब्धते बरोबरच रखडलेल्या नूतनीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com