वाढत्या उन्हात घशाला माठाच्या पाण्याचा गारवा

अमित गवळे
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

पाली (रायगड) : उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कोरडा पडलेला घसा ओला करण्यासाठी फ्रिज पेक्षा मातीच्या मडक्यातील (माठाच्या) थंडगार व चविस्ट पाण्यालाच अनेक जण पसंती देतात. त्यामुळे सध्या मातीच्या मडक्यांना खूप मागणी आहे. परिणामी हे बनवीणाऱ्या कारागीर, विक्रते व व्यावसाईकांना सुगीचे दिवस आले आहेत.

विविध आकार, रंग, पोत व किंमतीची असलेली मडकी बाजारात उपलब्ध आहेत. मध्यम आकाराचे म्हणजे साधारण एक हंडा पाणी मावेल एवढे मडके 100 ते 120 रुपयांपर्यन्त मिळते. तर मोठ्या आकाराचे 170 - 200 रुपयांना मिळते. मध्यम आकाराचे नळाचा कॉक लावलेले मडके 170 ते 150 रुपयांपर्यन्त मिळते. तसेच लहान आकाराचे मडके 60-70 रुपयांपर्यन्त मिळते. झाकण असलेली मडकी देखील उपलब्ध आहेत. तसेच विविध रंगानी नक्षिकाम केलेली मडकी देखील उपलब्ध आहेत. त्यांच्या किंमती आकार आणि त्यावरील नक्षिकामावर ठरतात. खालुन गोल असलेल्या मडक्यांसाठी स्टैंडची गरज असते. हे स्टैंड देखील अगदी 50 - 60 रुपयांत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. परराज्यातून किंवा शहरातून आलेल्या मडके विक्रेत्यांमुळे स्थानिक कारागीर व विक्रेत्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे.

Web Title: demand for sand pot for cool water in summer