लयभारी ! नितीशच्या पेन्सिलने रेखाटलेल्या चित्रांची भूरळ 

Demand From State To Nitish Jadhav Pencil Painting
Demand From State To Nitish Jadhav Pencil Painting

राजापूर ( रत्नागिरी ) - स्केचच्या कलाक्षेत्रातील कोणतेही शिक्षण नाही मात्र, आवड अन्‌ अंगभूत कलेला मेहनतीची जोड देत नितीश सिद्धार्थ जाधव बावीस वर्षीय तरुणाने पेन्सिलने रेखाटलेल्या हुबेहुब विविधांगी चित्रांनी साऱ्यांना भुरळ घातली आहे. त्याच्या चित्रांना राज्यभरातून मागणी आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उत्कृष्ठ चित्र रेखाटून त्याने पुण्यतिथीचे औचित्य साधून डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले. 
संगमेश्‍वर तालुक्‍यातील फुणगुस येथील मूळ रहिवाशी असलेला नितीश सध्या रत्नागिरीतील कुवारबांव येथे राहतो. राजापूर हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पदवीपर्यंतचे शिक्षण त्याने रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये घेतले.

लहानपणापासून त्याला विविध प्रकारची स्केच काढण्याची आवड आहे. अंगभूत असलेल्या कलेला वाव देताना त्याने गेल्या तीन वर्षापासून विविध नामवंत व्यक्तींसह हुबेहूब निसर्ग चित्र काढण्यावर भर दिला आहे. त्याच्या चित्रांना चंद्रपूर, औरंगाबाद, मुंबई आदीसह राज्यभरातून मागणी आहे. चित्रांचे रत्नागिरी येथे प्रदर्शन भरविण्याचा त्याचा मानस आहे. 

फेसबुकवर निवडक चित्रांचे शेअरिंग 
कलाक्षेत्रामध्ये अल्पवयात यश संपादन करणाऱ्या नितीशने इंस्टाग्राम व यूट्यूबवर "शेडस्‌ ऑफ ग्रे" नावाने स्वतःचे अकाऊंट उघडले आहे. फेसबुकवर त्याने निवडक रेखाटलेली चित्र शेअर केली आहेत. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांना त्यांचे चित्र भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काढलेले चित्र लवकरच त्यांना प्रत्यक्ष भेटीत देण्याचा त्याचा मानस आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com