esakal | गाळ उपसून काढल्यास पाणी टंचाईवर मात करणे होईल शक्‍य
sakal

बोलून बातमी शोधा

demand of water supply problem solved in ratnagiri kurdhe sada area in ratnagiri

गाळ तातडीने उपसला तर पाणीसाठा चांगल्याप्रकारे राहून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येईल.

गाळ उपसून काढल्यास पाणी टंचाईवर मात करणे होईल शक्‍य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पावस (रत्नागिरी) : रत्नागिरी तालुक्‍यातील कुर्धे सडा परिसरात शासकीय मालकीचे खांबतळे परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून दिवसेंदिवस हे तळे गाळात रुतत चालले असून त्यातील गाळ तातडीने उपसला तर पाणीसाठा चांगल्याप्रकारे राहून भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येईल. याकरिता तातडीने तळ्यातील गाळ उपसण्याची मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. 

पावस-पूर्णगड सागरी मार्गावरील कुर्धे सड्यावर पाण्याचे तळे असून यामध्ये मे अखेरपर्यंत पाण्याचा साठा असतो. सध्या या परिसरात दिवसेंदिवस वस्ती वाढू लागल्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण संपूर्ण कातळ परिसर असल्याने मे अखेरपर्यंत विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटत असते. त्यामुळे या परिसरातील लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. सध्या या तळ्याचा उपयोग एप्रिल-मे मध्ये अनेकजण कपडे धुण्याकरिता व जनावरांना पाणी पिण्याकरिता करतात. दरवर्षी पावसाळ्यामध्ये आजूबाजूच्या परिसरातील माती, दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर या तळ्यामध्ये जात असल्यामुळे दिवसेंदिवस तळ्यामध्ये गाळ वाढत चालला आहे. 

हेही वाचा -  प्रवाशांना दिलासा; कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांना अतिरिक्त डबा

हे तळे शासकीय मालकीचे असून ग्रामपंचायतीच्या ताब्यात परिसराची जागा आहे. या तळ्यातील गाळ उपसल्यास पाणीसाठा चांगल्या प्रकारे राहून परिसरातील विहिरीच्या पाण्याची पातळी चांगली राहील. तसेच भविष्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने या ठिकाणी खोदाई केल्यास पाण्याची पातळी वाढू शकते. शासनाने गाळ उपसण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन शासकीय जागेत तळ्याचे पुनर्जीवन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. 

सध्या शासकीय योजनेतून पिण्याच्या पाण्याकरिता विहिरी व विंधन विहिरी यांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळत असतो. परंतु त्याकरिता अनेक फुटापर्यंत खाली जावे लागते. त्यानंतरच पाणीसाठा मिळतो. परंतु हे तळे ग्रामपंचायतीच्या मालकीचे असून त्याकरता विशेष प्रयत्न केल्यास गाळ उपसून पाणीसाठा मुबलकप्रमाणात मिळू शकतो. त्यासाठी ग्रामस्थांच्यावतीने आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. 

- हेमंत अभ्यंकर, कुर्धे 

एक नजर 

- भविष्यात नळपाणी योजनेकरता प्रस्ताव ठेवता येईल 
- पाण्याची समस्या संपुष्टात आणता येईल 
- विविध योजनांच्या माध्यमातून पाण्यावर खर्च 
- खर्च करताना प्राचीन काळातील तळ्याचा उपयोग महत्वाचा 
- खोदाई केल्यास स्वच्छ व चांगल्या पाणी पुरवठा  

हेही वाचा - घरोघरी मासे विकून सोडवला उदरनिर्वाहाचा प्रश्‍न -

संपादन - स्नेहल कदम 

loading image