देवश्री गवसचा या क्रीडा प्रकारात विक्रम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

देवश्रीचे वडील विलास गवस हे तालुक्यातील आडाळी गावातील असून सध्या ते बदलापूरमध्ये राहतात आहेत. ते मुंबई महानगर पालिकेत अनुज्ञापन विभागात वरिष्ठ निरीक्षक आहेत. देवश्री हिला लहानपणापासूनच त्यांनी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी प्रोत्साहन देऊन स्केटिंग मध्ये उज्ज्वल यश मिळवण्यासाठी सहकार्य केले.

दोडामार्ग - आडाळीतील देवश्री विलास गवस हिने स्केटिंग या क्रीडा प्रकारात दमदार कामगिरी करुन गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आणि उत्तुंग यशाला गवसणी घातली. बेळगाव कर्नाटक येथील स्केटिंग स्पर्धेत त्यांच्या चमुने चमकदार कामगिरी केली. ती बदलापूर येथील सूरज स्केटिंग अकादमीची विद्यार्थिनी आहे. अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सलग 48 तास रोलर स्केटिंग करुन विश्वविक्रमाला गवसणी घातली.

देवश्रीचे वडील विलास गवस हे तालुक्यातील आडाळी गावातील असून सध्या ते बदलापूरमध्ये राहतात आहेत. ते मुंबई महानगर पालिकेत अनुज्ञापन विभागात वरिष्ठ निरीक्षक आहेत. देवश्री हिला लहानपणापासूनच त्यांनी आणि त्यांची पत्नी ललिता यांनी प्रोत्साहन देऊन स्केटिंग मध्ये उज्ज्वल यश मिळवण्यासाठी सहकार्य केले.

कुमारी देवश्री कारमेल कॉन्व्हेंट स्कूल बदलापूर मधील 9 ची विद्यार्थिनी आहे. ह्या पूर्वी तिने सिंगापूर, श्रीलंका इथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पदके मिळवली आहेत. 

देवश्री हिने बेळगांव कर्नाटक येथे शिवगंगा रोलर स्केटिंग स्पर्धेत बदलापूरच्या सुरज स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसह सलग 48 तास रोल स्केटिंग करून आपले  नाव गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले आहे. बेळगाव येथील स्पर्धेत  500 ते 600 मुलांचा सहभाग होता. विविध ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले होते . सुरज स्केटिंगच्या मुलांनी सहभाग घेऊन आपले व आपल्या बदलापूर शहराचे नाव उज्वल केल्याबद्दल पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे.

निसर्ग छायाचित्रकार प्रकाश कदम आणि आडाळीवासीयांनी खास संदेश पाठवून तिचे आणि तिच्या आईवडिलांचे अभिनंदन केले. तालुक्यात तिच्या यशाचे कौतुक होत आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devashri Gavas Do World Record In This Sport