esakal | कोकणच्या विकासासाठी एकत्र या : नारायण राणे
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणच्या विकासासाठी एकत्र या : नारायण राणे

कोकणच्या विकासासाठी एकत्र या : नारायण राणे

sakal_logo
By
दिपेश परब

वेंर्गुर्ले : वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (sindhudurg district) अतिशय निसर्गरम्य तालुका असून या नुतन मत्स्य बाजारपेठमुळे जिल्ह्याच्या सौंदयात भर पडली आहे. अतिशय स्वच्छ व सुसज्ज असलेली बाजारपेठ याठिकाणी तयार करण्यात आली आहे. कोकणचा (kokan) विकास करण्यासाठी सर्वांनी आजच्यासारखे एकत्र यावे. लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील नागरी सुविधा देत असताना दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत. नगराध्यक्ष दिलीप गिरप शहराला नवीन स्वरूप देत असताना जनतेला दर्जेदार सुविधा देतील, अशी आशा केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी व्यक्त केली. येथील पालिकेच्या सुसज्ज सागररत्न मत्स्य बाजारपेठचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्या हस्ते ऑनलाईन फलकाचे अनावरण करून करण्यात आले.

प्रस्ताविक भाषणात लोकप्रतिनिधी व प्रशासन ज्यावेळी एकत्र येत त्यातून कसा विकास घडतो हे मच्छिमार्केट याचे जिवंत उदाहरण आहे. माझ्या पाठीशी सर्व नगरसेवक, प्रशासन खंबीरपणे उभे राहिल्याने यामुळे ही लढाई आम्ही जिंकली, असे यावेळी नगराध्यक्ष गिरप यांनी सांगत मच्छिमार्केटबद्दल उपस्थितांना माहिती दिली व यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानले. सरकार निधी देत असत; मात्र या निधीचा सदुपयोग करताना पैसा वापरणारा सुद्धा तेवढाच खंबीर असावा लागतो. हे वेंगुर्ले नगरपंचायतीने दाखवून दिले. यापुढे सरकारमार्फत वेंगुर्लेला निधी कमी पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: 'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'

निधी मंजुर केल्यानंतर सर्वच कामे होतात असे नाही. ती कामे करून घेण्यासाठी दूरदृष्टी असावी लागते आणि ही दूरदृष्टी वेंगुर्ले नगरपंचायतकडे असल्याने हे शक्य झाले, असे यावेळी केसरकर म्हणाले. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहरातील मच्छिमार्केटसारख्या मुख्य पाच प्रकल्पाला भरघोस निधी दिल्यामुळे शहराचा विकास झाला, असे यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. यावेळी श्री. तेली, विलास गावडे, विधाता सावंत यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रसंन्ना कुबल, अभिषेक वेंगुर्लेकर, सुनील डुबळे, शिवसेना तालुकाध्यक्ष यशवंत परब, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांच्यासाहित पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, माजी राज्यमंत्री रविंद चव्हाण, आमदार दिपक केसरकर, आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरपंचायत जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे, तहसीलदार प्रवीण लोकरे, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, काँग्रेस कार्याध्यक्ष विलास गावडे, नगरसेवक विधाता सावंत, धर्मराज कांबळी, नागेश गावडे, प्रशांत आपटे, दादा सोकटे, नगरसेविका शितल आंगचेकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, कृपा गिरप-मोंडकर, पूनम जाधव, कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, जि. प सदस्य दादा कुबल, मनिष दळवी आदी उपस्थित होते. या सोहळ्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

हेही वाचा: पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

"एखाद्या प्रगत देशातील मत्स्य बाजारपेठेत आपण आलो असा भास ही अतिशय सुसज्ज मत्स्य बाजारपेठ बघितल्यानंतर झाला. मला विश्वास आहे, कोकणच्या विकासाला गती देण्याचे काम नारायण राणे यांच्या हस्ते होईल. भविष्यात वेगवेगळ्या योजना आहेत, त्याला मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील."

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री

युतीची स्वप्न बघणारे सुखावले

मागील काही दिवस युतीची चर्चा सुरू होती. दरम्यान आजचे हे व्यासपीठ बघितल्यानंतर युतीची स्वप्न बघणारे असंख्य कार्यकर्ते आज सुखावले असतील. कोकणच्या विकासासाठी एकत्र येण्याची वेळ आल्यास सर्व लोकप्रतिनिधी खांद्याला खांदा लावून यापुढे काम करू, असे आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी सांगितले.ज्या पद्धतीने वेंगुर्ले नगरपंचायत काम करत आहे, हे बघून एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा अभिमान वाटतो, असे सांगत शुभेच्छा दिल्या.

loading image