esakal | पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

sakal_logo
By
अमोल सावंत

कोल्हापूर : अळू कुठेही उगवतो. तरीही अळू पाहिले, की अनेक जण नाक मुरडतात. अळूबद्दल अजूनही कुणाला फारशी शास्त्रीय माहिती नाही. अळूची कोणी शेती करीत नाहीत. तो स्वस्त असूनही बाजारात कोणी फारसे विकत घेत नाहीत. श्रावणात तो आहारात वापरला जातो. वर्षभर अळू उगवत असतो. हा अळू पाणथळ जागी मिळतो. ज्यांना अळूचे महत्त्‍व माहिती आहे, ते मात्र चवीने खातात. पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा औषधी अळूचा आहारात वापर करावा.

अळूतील घटक

अळूच्या कंदात कर्बोदके २१ टक्के, प्रथिने तीन टक्के, कॅल्शियम, लोह असते. पानात अन्‌ देठात अ, ब, क जीवनसत्त्वे, कॅरोटीन, लोह असते. कंदातील रस रेचक असतो. अळू बीटा कॅरोटिन, फॉलेट, रिबोफ्लोवीन, थायमिनने समृद्ध आहे. अळूत झिंक, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, पोटॅशियमही आहे.

हेही वाचा: खचायचं नाही, लढायचं : अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले तरी कृषी केंद्रातून सेवा

अळूला नाक का मुरडतात?

पानात कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक असतात. हे स्फटिक सुईसारखे टोकदार असतात. भाजी खाताना हे स्फटिक घशाला घासले गेल्यास घसा खवखवतो. कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक चिंचेतील टार्टारिक आम्लात विरघळते, म्हणून अळूची भाजी करताना चिंच, आंबट पदार्थ टाकतात.

सुधारित जात

कोकण हरितपर्णी ही अळूची सुधारित जात विकसित केली आहे. काळपट जांभळ्या देठाची, मोठे रुंद त्रिकोणी पान असलेली, भरपूर कंद येणारी ही जात आहे. याची पाने अळूवडी करण्यासाठी उपयुक्त असून हेक्टरी ४ ते ५ टन हिरव्या पानांचे (देठासहित) आणि पाच ते सहा टन कंदाचे उत्पादन होते.

हेही वाचा: चिंताजनक! पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील कोरोनाची दुसरी लाट ओसरेना

शरीराला फायदा

वजन घटविण्यासाठी -मधुमेहाचे नियंत्रण, - बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो,-पानांमधून फायबरचा पुरवठा होतो,-अ‍ॅनिमियाचा त्रास रोखला जातो -कॅल्शियमचा पुरवठा होतो, -दृष्टी सुधारते, अनेक घातक आजारांपासून संरक्षण वात, पित्त, कफ नाशक, अशक्तपणा दूर करण्यासाठी, तापामुळे जीभेची चव जाते; पण अळूच्या पानामुळे चव परत येते शरीरात रक्त वाढवण्यास मदत, थायरॉईड ग्रंथींचे कार्य सुरळीत ठेवते.

अळूचे मूळ

  • अळू मूळ आग्नेय आशियातील

  • नंतर पॅसिफिक महासागरी बेटांवरही प्रसार

  • अळूच्या कंदाला ‘आर्वी’ म्हणतात

अळूचे पदार्थ

  • महाराष्ट्रात अळूवडी, फतफते केरळात चेंबिला करी

  • गुजरातमध्ये पात्रा, कोळंबी वापरून केलेली तिखट अळूवडी

  • कोथिंबीर वडीप्रमाणे बारीक चिरलेल्या अळूची वडी

  • नारळाच्या दुधातील अळूवडी

  • कर्नाटकच्या दक्षिण उडुपी भागात पात्रोडे

हेही वाचा: Gmail चा पासवर्ड विसरलात? 'या' सोप्प्या पद्धतीने करा रिकव्हर

"प्रत्येकाने आपल्या परिसरात अळूची लागवड करावी. जेणेकरून आहारात अळूचा वापर करता येईल. घरातून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे, त्यावर अळूचे कंद उगवतात. त्यामुळे सांडपाणी वाया जाणार नाही. अळूबरोबर अन्य झाडांनाही पाणी मिळेल."

- अनिल चौगले, सचिव, निसर्गमित्र संस्था

loading image