'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'

उर्वरित पावणे चार कोटी गेले कुठे? संजू परब यांचा केसरकरांना सवाल
'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'

सावंतवाडी : येथील हेल्थ पार्क व शिवउद्यान या दोन्ही ठिकाणच्या कामाला 25 लाख रुपयांच्यावर खर्च होणार नाही. आमदार दीपक केसरकर यांनी याला चार कोटी रुपये मंजूर केले. उर्वरित 3 कोटी 75 लाख रुपये गेले कुठे? हा भ्रष्टाचार असून आमदार केसरकर (deepak kesarkar) यांनी कोट्यावधीचा निधी कोणी उकळला हे अगोदर शोधून काढावे. राजकीय अस्तित्व संपवण्याची धमकी दिली म्हणून घाबरून घरी बसणार माझं व्यक्तिमत्त्व नाही असा पलटवार नगराध्यक्ष संजू परब (sanju parab) यांनी केला.

एमटीडीसीच्या माध्यमातून येथील पालिकेच्या मालकीच्या हेल्थ पार्क शुद्धीकरण तसेच शिवउद्यानांमध्ये खेळणी बसवण्याचे काम सुरू आहे. या कामाची नगराध्यक्ष परब यांनी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांसह अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पाहणी केली. यावेळी या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून काम पूर्ण होताच ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार दीपक केसरकर व तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर हे असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याला केसरकर यांनी प्रत्युत्तर देत नेमका भ्रष्टाचार कोण करतो हे जनतेने ओळखावे तसेच झालेले आरोप चुकीचे असून ह्याचे स्पष्टीकरण त्यांनी जनतेला द्यावे असे सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा नगराध्यक्ष परब यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांना प्रत्युत्तर दिले. यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक आनंद नेवगी, प्रवक्ते केतन आजगावकर आदी उपस्थित होते.

'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'
MPSC च्या मुद्द्यावरुन संभाजीराजेंची राज्य सरकारला विनंती

परब म्हणाले, 'माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी एमटीडीसीच्या माध्यमातून येथील शिव उद्यानात खेळणी बसवण्यासाठी तसेच हेल्प पार्क सुशोभीकरणासाठी दिलेल्या 4 कोटी रुपयांपैकी 25 लाख रुपयांचा निधी सुद्धा खर्च झालेला नाही. शिव उद्यानातील खेळण्याची किंमत दहा लाख रुपयेही होऊ शकत नाही. हेल्थ पार्क प्रकल्पाच्या दुरुस्तीत तात्पुरता मुलामा लावून 3 कोटी 84 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. या शहराचा नगराध्यक्ष या नात्याने आपण केसरकर यांना विनंती करतो की त्यांनी प्रत्यक्ष कामाचे पाहणी करावी, म्हणजे या कामात भ्रष्टाचार झाला की नाही हे त्यांच्या लक्षात येईल.

केसरकर यांनी वॉटर एटीएममध्ये (water ATM) भ्रष्टाचार झाला असा केलेला आरोप निराधार आहे. या प्रकल्पात पालिका प्रशासन तसेच माझा कोणताही संबंध नाही. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया जिल्हाधिकारी स्तरावरून झाली आहे. त्या ठेकेदाराचे बिल देखील करण्यात आले नाही. त्यामुळे हे ठिकाण निरर्थक आहे. परिणामी आपले अपयश लपवण्यासाठी निरर्थक प्रयत्न करु नये. स्वतः पालकमंत्री असताना त्यांनी आपल्या मतदार संघात खोट्या घोषणा करून जनतेची फसवणूक केली आहे. चष्म्याचा कारखाना, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशी अनेक आश्वासने हवेतच विरली; मंत्री असताना साधा कोणाला नोकरीलाही लावले नाही तर कोणा कार्यकर्त्यांनाही सक्षम बनवलं नाही.

'राजकीय अस्तित्व संपवण्याच्या धमकीला घाबरून घरी बसणार नाही'
पावसाळ्यात सहज उपलब्ध होणारा बहुगुणी अळू शरीरासाठी फायद्याचा

पुढे ते म्हणाले, 'दीड वर्षापूर्वी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरोधात तीन पक्ष एकत्र आले. तरीही जनतेने तुम्हाला नाकारले याची जाणीव केसरकरांनी ठेवावी. हेल्थ पार्क व शिवउद्यानात जी विकास कामे झाली त्यानंतर आपण नगराध्यक्षपदी बसलो. त्यामुळे ही विकासकामे माझ्या कारकिर्दीत झालेली नाही, उलट उद्यानातील खेळणी असलेल्या कामाची आपण पदभार घेताच चौकशी लावली. याबाबत पत्रव्यवहार केलेले पुरावेही आपल्याकडे आहेत. एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांना पालिकेत येण्यासंबंधी पत्र दिले; मात्र कोरोनाचे कारण काढून अधिकाऱ्यांनी बैठकीला येणे टाळले. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही पालिकेने ताब्यात घेतलेला नाही.

नगराध्यक्ष होण्यापूर्वीच पर्यटन विभागाने संबंधित ठेकेदाराचे बिल अदा केले. त्यामुळे केसरकर यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झाला आहे. ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनीही या प्रश्‍नी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यांनाही केसरकरांनी गप्प केले. खेळण्याची किंमत एमपीएससीने ठरवली तर यात पालिकेचा हस्तक्षेप कसा होईल ? याकडे लक्ष वेधताना आंबोली येथे उभारण्यात आलेल्या एमटीडीसीच्या प्रकल्पाला ग्रामपंचायत मंजुरी नाही, हेदेखील त्यांनी शोधून काढावे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com