देवगड तालुका आदर्श ठरेल - नितीन राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

देवगड - संपूर्ण जिल्ह्यात धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणालीच्या यंत्र वाटपाची सुरवात देवगड तालुक्‍यापासून होत आहे. यामुळे बायोमेट्रिक प्रणाली अंगीकारणारा देवगड तालुका आदर्श ठरेल, असा विश्‍वास जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत यांनी आज येथे व्यक्‍त केला. या वेळी धान्य दुकानदारांना यंत्र वाटपासह वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि येथील तहसील कार्यालय यांच्यातर्फे येथील इंद्रप्रस्त सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचावर प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे, तहसीलदार वनिता पाटील, चेन्नईच्या ओयासिस कंपनीचे प्रशिक्षक राजेंद्र नजरबागवाले, जिल्हा दक्षता समिती सदस्य प्रकाश गोगटे,

 धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास गोखले आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी सावंत यांच्या हस्ते बायोमेट्रीक प्रणाली यंत्र वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.

श्री. राऊत म्हणाले, ‘‘आधारकार्ड असलेली शिधापत्रिकेवरील कोणतीही व्यक्‍ती धान्य स्वीकारू शकते. दुकानदारांनी त्यांच्या आधारक्रमांकाची खात्री करून त्यांना धान्य वितरित करावयाचे आहे. यामुळे सर्वांचे आधारकार्ड असणे अनिवार्य ठरणार आहे. यातून फसवणुकीला आळा बसू शकेल. भविष्यात बायोमेट्रिक अनिवार्य होणार आहे.’’

या वेळी तालुक्‍यात एकूण ६५ धान्यदुकाने असून केवळ कुवळे, किंजवडे, दाभोळे आणि शिरवली या चार ठिकाणीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती देण्यात आली. या वेळी पुरवठा अव्वल कारकून जी. व्ही. मेस्त्री, पुरवठा निरीक्षक दिनेश सावंत, तांत्रिक सहायक स्वप्नील पाटकर तसेच तालुक्‍याच्या विविध भागातील धान्य दुकानचालक तसेच काही लाभार्थी उपस्थित होते. 

ज्यांचे आधार कार्ड नाही, अशांचे कार्ड काढण्याची व्यवस्था करण्यात येईल. वृद्ध, आजारी तसेच अपंग व्यक्‍तींचे आधार कार्ड काढण्यासाठी प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन कार्ड काढण्याची सोय केली जाईल. 
- नितीन राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: devgad konkan news Devgad Taluka will be ideal