भूसंपादनाच्या मोबदल्यापैकी २१० कोटी अद्याप पडून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुका - खातेदारांची उदासीनताही कारणीभूत

देवरूख - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात भूसंपादनाच्या मोबदल्यापैकी ९० टक्‍के रक्‍कम जमा झाली आहे. तरीही विविध अडचणींमुळे रत्नागिरी आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील लाभार्थ्यांची २१० कोटींची रक्‍कम अद्यापही महसूल विभागाकडे पडूनच आहे. 

रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुका - खातेदारांची उदासीनताही कारणीभूत

देवरूख - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात भूसंपादनाच्या मोबदल्यापैकी ९० टक्‍के रक्‍कम जमा झाली आहे. तरीही विविध अडचणींमुळे रत्नागिरी आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील लाभार्थ्यांची २१० कोटींची रक्‍कम अद्यापही महसूल विभागाकडे पडूनच आहे. 

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी तालुक्‍यातील ८, तर संगमेश्‍वर तालुक्‍यातील २१ अशा २९ गावांचा निवाडा जाहीर करण्यात आला होता. यासाठी भूसंपादन संस्थेकडून ३९७ कोटी ३ लाख ५४ हजार ८०२ या रकमेपैकी ३८१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यापैकी २०३ कोटी ३३ लाख ७८ हजार ३८६ रुपये इतका निधी रत्नागिरी तालुुक्‍यासाठी, तर १७८ कोटी ५२ लाख ८० हजार ६१७ रुपये इतका निधी संगमेश्‍वर तालुक्‍यासाठी आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील ८ गावांमधील ३३४० आणि संगमेश्‍वर तालुक्‍यातील २१ गावांमधील ७६०० खातेदार या निधीसाठी पात्र आहेत.

यापैकी आतापर्यंत दोन्ही तालुक्‍यातील ३३९० खातेदारांना ८९ कोटी ७६ लाख ४५ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले, तर ४२१० खातेदारांना वाटप होणे बाकी आहे. 

रत्नागिरी आणि संगमेश्‍वर तालुक्‍यांतील ५९२८ खातेदारांपैकी काहींनी आवश्‍यक कागदपत्रे अद्यापही सादर केलेली नाहीत, तसेच सात-बारा उताऱ्यावरील नोंद असलेल्या प्रत्येक खातेदाराला त्याची रक्‍कम त्वरित वितरित केली जात आहे; मात्र अनेकांची आणेवारीची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने हे वाटप होऊ शकलेले नाही. रत्नागिरी तालुक्‍यातील ४ गावांमध्ये उशिरा मूल्यांकन झाल्याने या चार गावांसाठी द्यावयाच्या मोबदल्याच्या रकमेची मागणी करण्यात आली आहे. यातील दोन्ही तालुक्‍यांत १५२ कोटी ३० लाखांचे वाटप करण्यात आले असले, तरी खातेदारांची उदासीनता तसेच इतर तांत्रिक कारणाने मोबदला वाटपाचे तब्बल २१० कोटी रुपये तसेच पडून आहेत. संबंधित खातेदारांनी तातडीने कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच तांत्रिक अडचणी सोडवून निधी वाटपासाठी जिल्हा प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

सुमारे ३८२ कोटी निधी हाती
महामार्ग चौपदरीकरणासाठी रत्नागिरी व संगमेश्‍वर तालुक्‍यांतील ३४ गावांमधील ११२ हेक्‍टर क्षेत्र संपादनात येणार होते. त्यापैकी संगमेश्‍वरमधील २१ आणि रत्नागिरीतील १२ अशा ३३ गावांमधील ९५.४१ हेक्‍टर क्षेत्र निश्‍चित झाले आहे. त्यासाठी ३८१ कोटी ८५ लाख ९२ हजार ९६१ इतका निधी भूसंपादन संस्थेकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

 ९० टक्के रक्कम प्रशासनाहाती

एकूण २९ गावांचा निवाडा जाहीर

आणेवारीची प्रकरणे न्यायप्रविष्ट

चार गावांचे मूल्यांकन उशिरा

Web Title: devrukh konkan news 210 crore pending land aquisition