बिबट्याच्या हल्ल्यात दोन भावंडे जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

देवरुख - कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या घरात घुसला आणि घरातील दोन मुलांना जखमी करून पळाला. ही घटना रविवारी (ता. 3) काटवली ढोसलवाडीत (ता. संगमेश्वर) घडला. अन्य लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या बिथरला आणि घराबाहेर पडला.

काटवली ढोसलवाडीत प्रकाश गोविंद घवाळी (45) पत्नी ज्योती व दोन मुलांसह राहतात. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज झाल्याने ते जागे झाले. दिवा लावून त्यांनी पाहिले; तेव्हा समोर बिबट्याचे दर्शन झाल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. कुत्र्याचा पाठलाग करीत बिबट्या घरात घुसल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरवात केली. त्यामुळे बिथरलेल्या बिबट्याने त्यांचा मुलगा राहुल (वय 14) आणि मुलगी प्रीतीवर (वय 17) हल्ला चढवला. घरातील अन्य लोकांनी आरडाओरडा केल्याने घाबरून बिबट्या घराबाहेर पडला.

Web Title: devrukh konkan news leopard attack

टॅग्स