येडगेवाडीतील विद्यार्थ्यांसाठी एस.टी. धावणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

देवरुख - संगमेश्वर तालुक्‍यातील येडगेवाडीतील १६ विद्यार्थी शाळेपासून वंचित राहिले. त्याला एस.टी. सुविधेचा अभाव असल्याचे वृत्त ‘दै. सकाळ’ने शुक्रवारी प्रसिद्ध केल्यावर एस.टी. प्रशासन खडबडून जागे झाले. रत्नागिरी विभाग नियंत्रकांनी तातडीने चिपळूण आगाराला सूचना देत शाळेच्या वेळेतील चिपळूण-पाचांबे बस येडगेवाडीपर्यंत सोडण्याचे आदेश दिले. सोमवारपासून हे विद्यार्थी शाळेत जाऊ शकतील. महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडून न्याय मिळवून दिल्याबद्दल येडगेवाडीवासीयांनी ‘सकाळ’चे विशेष आभार मानले. 

येडगेवाडी येथील १६ विद्यार्थी यावर्षी शिक्षणासाठी कुंभारखाणी हायस्कूलला जाणार आहेत. येडगेवाडी ते कुंभारखाणी हे अंतर १९ किमी आहे; परंतु चिपळूण आगारातून सकाळी ७.४५ वाजता सुटणारी या मार्गावरील गाडी घाडगेवाडीपर्यंतच येत होती. परिणामी येडगेवाडीतील विद्यार्थ्यांना बसची सुविधा मिळत नव्हती. शाळेत जाण्याचा प्रश्न असल्याने पालकांनी पाल्यांचा शाळेत प्रवेश घेतलाच नव्हता. पहिले दोन दिवस एसटी नसल्याने विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेनाहीत. त्यामुळे चिपळूण-पाचांबे ही बस येडगेवाडीपर्यंत नेण्याचे तातडीचे आदेश विभाग नियंत्रकांनी आगार प्रमुखांना दिले. सोमवारपासून ही बस सुविधा उपलब्ध होईल.

कोण जाणार शाळेत 
समृद्धी येडगे (पाचवी), नीतेश येडगे, सुरेश येडगे, सविता येडगे, अंजनी येडगे, मंगेश येडगे (सर्व सहावी), धोंडू येडगे, अंजनी बाबाजी येडगे, भक्ती येडगे, वसंत येडगे (सातवी), कल्पेश येडगे, हरिश्‍चंद्र येडगे (आठवी), गणेश येडगे, राजेंद्र येडगे, संतोष शेळके (नववी), सीता येडगे (दहावी) या विद्यार्थ्यांना आता पुन्हा शाळेत जायला मिळणार आहे.

Web Title: devrukh konkan news st for student in yedagewadi