
देवरुख काॅलेज मैदानात सहा हजार मुलांनी अनुभवला सुखोई ,मिराज, राफेल विमानांचा थरार दहा विमान प्रकारांच्या हवेत कसरती ..
'या' विमानांच्या दुनियेत रमली देवरुखातील विदयार्थी....
साडवली (रत्नागिरी) : देवरुख मधील स्नेह परीवार लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबवत असते. याच मुलांसाठी देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने एरोमाॅडेलींग शोचे आयोजन केले होते. देवरुख महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानात सुखोई, मिराज, राफेल अशा विमानांच्या कसरतींचा थरार ६ हजाराहून अधिक मुलांनी अनुभवला. या मुलांचे कुतुहल पाहण्यासाठी मुलांबरोबर पालक, शिक्षकही मैदानात हजर होते.
हेही वाचा- अखेर सापडलाच हा मास्टर माईंड....
सातारा येथील प्रसिद्ध विमान छांदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे. अथर्व काळे व अक्षय काळे हे विमान उडवण्याचे काम करतात. देवरुख महाविद्यालयाच्या मैदानात विमान कसरतींचा दोन तासांचा खेळ रंगला. मुलांनी एकच गलका करत हा प्रयोग एंजाॅय केला. विमान व त्याचे तंञ या मुलांनी शिकुन घेतले व घरी विमान बनवण्यासाठी संचही विकत घेतले. एरोमाडेलिंग शो मध्ये ग्लायडर, उडती तबकडी, मासा याबरोबरच सुखोई, मिराज, राफेल या वायुदलातील विमानांच्या कसरतींचा थरार या मुलांनी अनुभवला.
हेही वाचा- चंद्रकांत पाटीलांची मिळाली सूचना आणि लगेच भाजप प्रेमींनी देवीला घातले साकडे..
कावळे विमानाच्या मागे लागले
यासाठी देवरुख परीसराबरोबरच रत्नागिरी, लांजा, साखरपा, संगमेश्वर, हातीव या भागातील मुले व पालक हजर होती.
सुरुवातीला ईगल पक्षाच्या रुपातील विमान हवेत उडवले गेले व ते फिरु लागल्यावर परीसरातील कावळे ही या ईगल विमानाचा पाठलाग करु लागले. हा प्रसंग नेहमीच येतो असे काळे यांनी सांगितले. गेली तीस वर्ष सदानंद काळे हा एरोमाॅडेलिंगचा छंद जोपासत असुन विमान प्रकारात मुलांमध्ये जागृती व्हावी, मुलांना विमान तंञ समजावे यासाठी ते सतत प्रयत्नशील रहात आहेत. संयोगिता काळे ,सदानंद काळे हे दोन मुलांसह हा विमान प्रवास अनुभवत आहेत. देवरुखमधील स्नेह परीवाराच्या या शो साठी देवरुख हायस्कुल,शाळा नं.४ तसेच देवरुख महाविद्यालयाने सहकार्य केले